पुणे 20, जून 2022
आगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त पुण्यामध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये योग उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर भारत सरकार तर्फे या योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय; राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आयुष मंत्रालय, पुणे; केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, पुणे व पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी हा योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे तर्फे आयोजित योग व योगगुरुंबद्दल माहिती देणारे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येईल. या तीन दिवसीय योग चित्र प्रदर्शन विनामूल्य आहे. योगोत्सवात सहभागी होणाऱ्या पहिल्या एक हजार नागरिकांना फुगेवाडी ते पिंपरी आणि परत असा मोफत प्रवास/ जॉय राईड मिळणार आहे.
उद्याच्या योग दिनाचे औचित्य साधून नांदगाव, नाशिकच्या न्यू इंग्लिश प्रशालेमध्ये दिनांक 18 जून रोजी योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रात्यक्षिक, व्याख्यान, प्रश्नमंजुषा स्पर्धा व जागृती फेरी द्वारे योगप्रचार करण्यात आला.
केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद, योग संवर्धन संस्था व भारतीय योग संस्थान, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने काल भानुदास चव्हाण सभागृह प्रांगण येथे योग दिंडी काढण्यात आली होती. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, डॉ. भागवत कराड यांनी या दिंडीला सुरुवात करून दिली. योग प्रात्यक्षिक केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद तर्फे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमात योग लोगो छापलेल्या टोप्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी औरंगाबाद शहरातील विविध योग संस्थेतील योग प्रेमी तसेच स्काउट गाइडचे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्र औरंगाबादचे स्वयंसेवक या योग दिंडीत मोठ्या संखेने सामिल झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवदर्शन सांस्कृतिक संच, औरंगाबाद यांच्या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर शहरात 500 लोकांच्या रॅलीने काल जनजागृती केली. 21 जून रोजी हरिभाई देवकरण प्रशाळेमध्ये नागरिक योग जागर करतील. सुमारे सात हजाराहून अधिक नागरिक यावेळी उपस्थित असतील. सोलापूरमधील प्रतिष्ठित योग गुरूंचा सत्कार यावेळी करण्यात येईल. नेहरू युव केंद्र, जिल्हा प्रशासन, विवेकानंद केंद्र, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजलि योगपीठ या कार्यक्रमात सहभागी हॉट आहेत.
पोलीस परेड ग्राऊंड, अलिबाग येथे एका विशेष प्रचारात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये योग अभ्यासक, मार्गदर्शन, प्रचार फेरी व महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ जसे की मल्लखांब, लाठी-काठी, दांडपट्टा अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. केंद्रीय संचार ब्यूरो सह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था, श्री अंबिका योग कुटीर, ठाणे यांचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर तसेच नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे कॉमन योग प्रोटॉकल वर आधारित योग प्रात्यक्षिके करण्यात येतील; योगाला प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी शाहिरी पोवाडा कला मंच कोल्हापूर, प्रोत्साहनपर पोवाड्याचे सादरीकरण करतील. नेहरू युवा केंद्र संघटन मार्फत 17, 18 आणि 19 जून रोजी झालेल्या तालुका स्तरावरील योग प्रात्यक्षिक आधारित स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील करण्यात येईल. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एक दिवस आधी कळंबा तर्फ ठाणे येथे जिल्हा महिला व बालविकास विभाग, कळंबा ग्रामपंचायत आणि केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने योगावर आधारीत कार्यशाळेचे आणि योग आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सर्व शाळांना आंतरराष्ट्रीय योग दिनी योगाभ्यास करण्याविषयी देखील आवाहन करण्यात आलेले आहे.
केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्यूरो, नागपूर तर्फे 20 जून रोजी रांगोळी व चित्रकला स्पर्धा आणि 21 जून 2022 रोजी बजाज नगर येथील कृषीकुंजच्या कम्युनिटी हॉल मध्ये योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यवतमाळमध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्येष्ठ योग प्रसारक यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम हा केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, अमरावती, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, नगर परिषद प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, होमगार्ड कार्यालय, पतंजली योग समिती, रविशंकर आर्ट ऑफ लिव्हींग, क्रीडा भारती, यवतमाळ जिल्हा हौसी असोसिएशन, यवतमाळ जिल्हा शारिरीक शिक्षण संघटना, आरोग्य भारती, संस्कार भारती, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, विविध योग समिती संघटना मंडळ अशा सुमारे अकराहून अधिक विविध सामाजिक संस्था व संघटना यांच्या सयुंक्त विद्यमाने घेण्यात येत आहे. यावेळी नृत्याधारीत योग प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत.
जळगावच्या निमखेडी मार्ग येथे योग शिबिर व प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय संचार ब्यूरोचे जळगाव मधील क्षेत्रीय कार्यालय, इंद्रदेवजी योग विद्या संस्था व आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल यासर्वांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील ७५ स्थळांमध्ये योगोत्सव साजरा होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन स्थळांचा समावेश आहे. पैकी सेवाग्राम, वर्धा येथील चरखा गृहामध्ये जिल्हास्तरीय योग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, पर्यटन संचालनालय, नागपूर विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा, महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी पतंजली योग संस्थान वर्धा आणि वर्धा जिल्हा योग काऊन्सिल या संस्थांचे सहकार्य लाभले आहे. योग प्रशिक्षकांमार्फत सहभागींना योगासने आणि त्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल. मन आणि शरीर यांच्यात ताळमेळ साधण्यासाठी योगाचा फायदा आपल्याला कसा होते, याची माहिती या सत्रात देण्यात येईल.
केंद्रीय संचार ब्यूरो, नांदेड तर्फे परभणी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान, धर्मापुरी येथे ग्रामपंचायत व महविद्यालयासोबत योग सत्र आयोजित करण्यात आले आहे.
गोव्यातील पणजी शहराजवळील पर्वरी येथील संजय स्कूलमधील विशेष मुलांची योग कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने चित्रकला व योग प्रात्यक्षिके स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. गोव्याचे पहिले पद्म पुरस्कार विजेते ब्रम्हानंद सांखळवालकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.