पुणे विभागातील 19 लाख 9 हजार 203 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 लाख 69 हजार 261 रुग्ण
–विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 13 : पुणे विभागातील 19 लाख 9 हजार 203 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 69 हजार 261 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 425 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 633 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.95 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 26 हजार 250 रुग्णांपैकी 10 लाख 99 हजार 537 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 23 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.36 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 44 हजार 521 रुग्णांपैकी 2 लाख 32 हजार 64 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 303 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 154 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 97 हजार 406 रुग्णांपैकी 1 लाख 90 हजार 277 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 229 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 900 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 95 हजार 770 रुग्णांपैकी 1 लाख 88 हजार 849 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 765 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 5 हजार 314 रुग्णांपैकी 1 लाख 98 हजार 476
रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 105 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 733 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 701 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 794, सातारा जिल्ह्यात 418, सोलापूर जिल्ह्यात 218, सांगली जिल्ह्यात 176 तर
कोल्हापूर जिल्ह्यात 95 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 34 आहे. पुणे जिल्हयामध्ये 995, सातारा जिल्हयामध्ये 309, सोलापूर जिल्हयामध्ये 306, सांगली जिल्हयामध्ये 323 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 101 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 60 लाख 85 हजार 469 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 69 हजार 261 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)