पुणे विभागातील 19 लाख 16 हजार 289 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 लाख 73 हजार 646 रुग्ण
–विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 16 :- पुणे विभागातील 19 लाख 16 हजार 289 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 73 हजार 646 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 632 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 725 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.09 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 28 हजार 462 रुग्णांपैकी 11 लाख 2 हजार 247 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 504 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 711 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.68 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 45 हजार 257 रुग्णांपैकी 2 लाख 34 हजार 220 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 856 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 98 हजार 145 रुग्णांपैकी 1 लाख 91 हजार 244 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 987 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 914 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 96 हजार 308 रुग्णांपैकी 1 लाख 89 हजार 740 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 390 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 5 हजार 474 रुग्णांपैकी 1 लाख 98 हजार 838 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 741 आहे. कोरोनाबाधित एकूण 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 683 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 949, सातारा जिल्ह्यात 238, सोलापूर जिल्ह्यात 273, सांगली जिल्ह्यात 165 तर कोल्हापूर जिल्ह्यात 58 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 402 आहे. पुणे जिल्हयामध्ये 787, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 928, सोलापूर जिल्हयामध्ये 268, सांगली जिल्हयामध्ये 288 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 131 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 62 लाख 25 हजार 396 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 73 हजार 646 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 15 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )