पुणे विभागातील 19 लाख 19 हजार 821 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी *विभागात कोरोना बाधित 19 लाख 76 हजार 871 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 18 :- पुणे विभागातील 19 लाख 19 हजार 821 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 76 हजार 871 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 262 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 788 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.11 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 30 हजार 178 रुग्णांपैकी 11 लाख 3 हजार 659 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 791 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 728 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.65 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 45 हजार 712 रुग्णांपैकी 2 लाख 34 हजार 948 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 571 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 98 हजार 691 रुग्णांपैकी 1 लाख 91 हजार 837 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 932 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 922 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 96 हजार 691 रुग्णांपैकी 1 लाख 90 हजार 274 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 220 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 5 हजार 599 रुग्णांपैकी 1 लाख 99 हजार 103 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 748 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 748 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 534 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 811, सातारा जिल्ह्यात 203, सोलापूर जिल्ह्यात 313, सांगली जिल्ह्यात 151 तर कोल्हापूर जिल्ह्यात 56 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 120 आहे. पुणे जिल्हयामध्ये 709, सातारा जिल्हयामध्ये 702, सोलापूर जिल्हयामध्ये 305, सांगली जिल्हयामध्ये 248 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 156 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 63 लाख 48 हजार 332 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 76 हजार 871 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )