पुणे :ज्येष्ठ शोधपत्रकार निरंजन टकले यांनी लिहिलेल्या ‘न्या. लोयांचा खुनी कोण?’या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन १२ ऑगस्ट २०२२ रोजी, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ लेखक संजय सोनवणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा प्रकाशन समारंभ शुक्रवार, १२ ऑगस्ट २०२२ रोजी सायं. ५.३० वाजता पुण्यातील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला असून, पुणे शहरात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असणा-या युवक क्रांती दल, संविधानिक राष्ट्रवाद मंच, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदिर, जनसेवा सहयोग कम्युनिटी सेंटर, इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप (ट्रस्ट) आणि जय हिंद लोकचळवळ या संस्थांनी संयुक्तपणे या समारंभाचे संयोजन केले आहे.
निरंजन टकले यांनी मूळ इंग्रजीतून लिहिलेल्या “व्हू किल्ड जज लोया” या पुस्तकाचा श्रीमती मुग्धा धनंजय यांनी मराठीतून अनुवाद केला आहे.
संयोजन समिती तर्फे प्रशांत कोठडिया,संदीप बर्वे,प्रसाद झावरे,रविंद्र माळवदकर ,प्रा. तमन्ना इनामदार,अस्लम बागवान ,नरेंद्र व्यवहारे ,नीलम पंडीत,संकेत मुनोत यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.