महावितरणच्या हेन्ले उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलणार
पुणे, दि. २१ सप्टेंबर २०२१ : महावितरणच्या बंडगार्डन विभाग अंतर्गत हेन्ले उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचा मोठा पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी (दि. २३) सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हडपसर, मुंढवा परिसरातील काही भागात वीजपुरवठा बंद राहणार आहे.
महावितरणच्या हेन्ले उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचा २५ वर्षांपूर्वीचा पॉवर ट्रॉन्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे तो बदलणे आवश्यक झाले आहे. नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर उपलब्ध झाला असून तो बसविण्याचे काम गुरुवारी (दि. २३) सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी या उपकेंद्रातील सर्वच १३ उच्चदाब वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.यासंदर्भातमहावितरणकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईलधारक संबंधीत वीजग्राहकांना ‘एमएसएम’द्वारे पूर्वमाहिती देण्यात येत आहे.तसेच संबंधीत रुग्णालयांना जनित्राद्वारे वीजपुरवठ्याची तात्पुरती व्यवस्था करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
हेन्ले उपकेंद्रांतील पूर्वनियोजित कामामुळे हडरसरमधील वैदूवाडी, गोसावी वस्ती, मंत्री मार्केट, कामधेनु इस्टेट, रामटेकडी इस्टेट, मगरपट्टा रोड, सुभाषनगर, शंकरमठ, हडरसर इंडस्ट्रीयल इस्टेट, लक्ष्मीनगर, सेफ कॉलनी, सेंट पॅट्रिक टाऊन, एसव्ही नगर आदी परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती महावितरणकडून करण्यात आली आहे.