पुणे- आंबील ओढ्याला क्ल्व्हरट बांधण्याच्या कामासाठी ३२ ते ३८ कोटीच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या टेंडर मधून सुमारे १२ कोटी हडपण्याचा डाव तर उधळला आयुक्तांनी ,अतिरिक्त आयुक्तांमार्फत केलेल्या प्राथमिक चौकशीत आता हा डाव संगनमताने रचणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे हि स्पष्ट झाली .पण आता या दोषींवर कारवाई करणार कोण ? आणि कधी ? असा सवाल करत महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी ,तातडीने स्थायी समितीने देखील पुढील कारवाई चा आग्रह धरला पाहिजे अन्यथा स्थायी समितीबाबत देखील संशय निर्माण होईल असे सांगत कारवाई साठी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. या प्रकरणाची हकीकत अशी कि आंबील ओढ्यावर तातडीने कलव्हर्त बांधण्यासाठी आलेले पूर्वगणनपत्रकाहून कमी किमतीचे आलेले टेंडर न स्वीकारता ज्यादा दराने आलेले टेंडर अपात्र असताना स्वीकारून त्याबाबत स्थायी समितीची मान्यता घेण्यात आली . हा प्रकार अरविंद शिंदे यांनी लेखी पत्र देवून आक्षेप घेत घडकीस आणला . त्यानंतर या टेंडर ची पुढील प्रक्रिया थांबवून आयुक्तांनी ,याप्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्तांमार्फत प्राथमिक चौकशी सुरु केली असे सांगून अरविंद शिंदे म्हणाले ,’ या चौकशीचा अहवाल देखील आला असल्याची माहिती आम्हाला समजली आहे . या अहवालानुसार या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून पुढील कारवाईची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे . आता आयुक्तांनी तातडीने हि कारवाई करावी म्हणजे महापालिकेची तिजोरी लुटू पाहणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच आला बसेल .शिवाय संबधित ठेकेदारावर देखील कारवाई केली पाहिजे यात चाल ढकल केल्यास या प्रवृत्ती आणखी फोफावतील . आणि स्थायी समितीने आता आम्ही अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून या टेंडर ला मान्यता दिल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे . त्यामुळे आता स्थायी समितीने देखील कारवाईचा आग्रह धरला पाहिजे ,अन्यथा स्थायी समिती बाबत हि संशयाचे वातवरण निर्माण होईल . पहा नेमके याबाबत अरविंद शिंदे यांनी काय म्हटले आहे ते ऐका नेमके त्यांच्याच शब्दात …..