पुणे विभागातील 9 हजार 778 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 15 हजार 563 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे:- पुणे विभागातील 9 हजार 778कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 हजार 563 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 5 हजार 83 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 255 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.83 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 12 हजार 147 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 7 हजार 619 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 27 आहे. कोरोनाबाधित एकूण 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 255 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.72 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.12 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 365 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 270, सातारा जिल्ह्यात 12 , सोलापूर जिल्ह्यात 63, सांगली जिल्ह्यात 20 तर कोल्हापूर जिल्ह्यात 0 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 738 कोरोना बाधीत रुग्ण असून 508 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 196 संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 722 कोरोना बाधीत रुग्ण असून 911 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 659 आहे. कोरोना बाधित एकूण 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 236 कोरोना बाधीत रुग्ण असून 117 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 112 संख्या आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 720 कोरोना बाधीत रुग्ण असून 623 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 89 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 18 हजार 411 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 15 हजार 842 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 569 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 27 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 15 हजार 563 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
( टिप :- दि. 15 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )