पुणे विभागातील 12 लाख 14 हजार 630 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 14 लाख 1 हजार 303 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 15 : पुणे विभागातील 12 लाख 14 हजार 630 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 लाख 1 हजार 303 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 59 हजार 921 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 26 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.68 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 58 हजार 650 रुग्णांपैकी 8 लाख 57 हजार 175 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 86 हजार 502 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 हजार 973 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.41 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 33 हजार 271 रुग्णांपैकी 1 लाख 4 हजार 833 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 863 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 575 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 26 हजार 551 रुग्णांपैकी 1 लाख 5 हजार 832 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 285आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 97 हजार 705 रुग्णांपैकी 77 हजार 869 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 6 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 85 हजार 126 रुग्णांपैकी 68 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 265 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 940 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 12 हजार 849 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 6 हजार 237, सातारा जिल्ह्यात 2 हजार 111, सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 155, सांगली जिल्ह्यात 1 हजार 292 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 54 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 15 हजार 873 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 811, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 824, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 724, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 577 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 937 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 77 लाख 41 हजार 276 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 14 लाख 1 हजार 303 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 14 मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)