पुणे विभागातील 6 लाख 5 हजार 152 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 6 लाख 42 हजार 357 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 12 :- पुणे विभागातील 6 लाख 5 हजार 152 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 42 हजार 357 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 20 हजार 699 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 506 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.57 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.21 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 28 हजार 344 रुग्णांपैकी 4 लाख 1 हजार 948 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 17 हजार 132 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.16 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.84 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 60 हजार 275 रुग्णांपैकी 56 हजार 631 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 782 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 862 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 142 रुग्णांपैकी 51 हजार 92 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 184 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 866 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 823 रुग्णांपैकी 46 हजार 753 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 305 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 773 रुग्णांपैकी 48 हजार 728 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 296 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 749 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 166 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 840, सातारा जिल्ह्यात 152, सोलापूर जिल्ह्यात 118, सांगली जिल्ह्यात 24 तर कोल्हापूर जिल्ह्यात 32 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 495 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 303, सातारा जिल्हयामध्ये 89, सोलापूर जिल्हयामध्ये 48, सांगली जिल्हयामध्ये 15 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 40 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 42 लाख 69 हजार 341 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 42 हजार 357 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 11 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )