पुणे-इंडियन फार्मा फेअर (आयएफएफ) २०१९ या भव्य फार्मासिटिकल आणि हेल्थकेअर इंडस्ट्री च्या प्रदर्शनाचे सुरुवात आज पासून झाली. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन (एमएससीडीए) चे सरचिटणीस श्री. अनिल नवंदर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. या मेगा एक्स्पोने गोरखपूर आणि हुबळीनंतर पुण्यात प्रथमच हे व्यावसायिक प्रदर्शन साकारले आहे. फार्मासिटिकल आणि हेल्थकेअर क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, विकास व व्यवसायाच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी बोलताना एमएससीडीए सरचिटणीस श्री. अनिल नवंदर म्हणाले कि “इंडियन फार्मा फेअर एक उत्तम व्यासपीठ आहे जे फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर उद्योगातील छोट्या उत्पादकांना संधी देते. येत्या काही वर्षांत या उद्योगाने मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे आणि यामुळे या व्यवसायांना व सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.”
इंडियन फार्मा फेअर चे श्री. शिवम शर्मा म्हणाले कि “इंडियन फार्मा फेअर चे उद्दिष्ट भारतीय आरोग्य सेवा प्रदात्यांना एकाच छताखाली आणणे आहे. याने भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील उद्योक व्यवसायांना चालना मिळेल व नवनवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील.”
या वेळी आयएफएफचे डायरेक्ट श्री. बी. एस. भंडारी, बच्चूभाई ओसवाल महाराष्ट्र राज्याच्या वेस्ट झोनचे केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनचे सरचिटणीस, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शन मध्ये देशभरातील औषधी उत्पादन कंपन्या, पीसीडी / फ्रेंचायझी यांनी तसेच आयुर्वेदिक आणि हर्बल उत्पादक यांनी देखील सहभाग घेतला होता.