आजवरच्या महापालिकेच्या इतिहासातील पहिलीची आगळी वेगळी ऐतिहासिक सभा
१४ मिनिटात ७ लाखाची उधळण
पुणे- महाविकास आघाडीच्या सरकारी आदेशाच्या पत्राला केराचो टोपली दाखवीत …छत्रपती शिवाजी महाराज सभागृह तर सोडाच पण पुण्याच्या महापौरांनी थेट आपल्या अँटीचेंबर मधून आजवर उभारली नाही अशी खास ऑनलाईन यंत्रणा उभारून खास सभा घेतली आणि एक विषय मंजूर करवून घेत १४ मिनिटात हि सभा तहकूब करून टाकली . ७ लाख रुपये खर्च केलेल्या या ऑनलाईन कारभारात किती नगरसेवक ,कोण कोण नगरसेवक उपस्थित होते, कशा पद्धतीने कोणता विषय मंजूर झाला याबाबत कोणालाही काहीही माहिती देण्नयात येत नव्हती . माहिती घेऊन सांगू असे उत्तर दिले जात होते. कोरोनाच्या नावाखाली यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहातच ऑनलाईन सभा झालेल्या असताना आता प्रत्येक वार्ड ऑफिसमधून बसविलेले कॅमेरे , एल ई डी वाल , मोठ मोठे टीव्ही संच आणि त्यांना जोडणारी महापौरांच्या आतील दालनात बसविलेली यंत्रणा यांचा वापर करवून अशा पद्धतीने अपारदर्शी खास सभा का घेण्यात आली ? अशा ऑनलाईन सभांच्या मागे नेमके दडलंय तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी राज्य शासनाच्या आदेशानुसार काम करत असल्याचे असमाधानकारक स्पष्टीकरण देताना दिसत आहेत . तर राज्य शासनाचेही स्पष्ट आदेश ,खास वाक्विल्या ,तुकविलया जाणाऱ्या शब्दात दिले जात असल्याने … दोहोंच्या बाबत संशय निर्माण होईल अशी स्थिती दिसून येते आहे.
राज्य सरकारने कालच्या तारखेला काढलेले हे आदेश पहा …
असे आदेश असले तरीही महापौरांनी ,यापूर्वी सभागृहात घेतलेल्या ऑनलाईन सभेप्रमाणे सुद्धा आजची खास सभा घेतली नाही . आणि ती थेट आपल्या अँटीचेंबर मधून कशा पद्धतीने ऑपरेट होईल याची संपूर्ण तजवीज करून ठेवली. हि तजवीज त्यांनी शहरात कोरोनाचे रुग्ण शेकडोने मृत पावत असताना ,आढळून येत असताना केली नव्हती . त्यांनी आजपर्यंत ऑनलाईन सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहातूनच घेतल्या होत्या . मात्र आता कोरोनाची भीती कमी झाल्यावर त्यांनी अशी कडेकोट तजवीज केली कि त्यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा ताफा होता.
ज्या अँटीचेंबर मधून हि सभा घेतली गेली तिथे कोणास जाण्याची अनुमती नव्हती. कित्येक नगरसेवक दरवाजे ठोठावत होते पण दरवाजे उघडले गेले नव्हते .या सभेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी ने जोरदार घोषणाबाजी केली. महापौर ज्या ठिकाणी व्हिडीओ काॅन्फरंसिंग करत होते. त्या ठिकाणी दरवाजा उघडण्यासाठी मोठ्या प्रमाणात झटापट झाली.यावेळी नगरसेवकांनी ‘भाजपचा धिक्कार असो, या चोरांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या भाजपचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी महापौर दालन दणाणून सोडले.यावेळी सर्व विरोधी पक्ष नेते एकत्र आले .त्यांनी त्यांची बाजू मांडली .आणि महापौरांवर आरोप केले. या आंदोलनात विरोधी पक्षनेते दीपाली प्रदीप धुमाळ, आबा बागुल ,अविनाश बागवे ,अश्विनी कदम, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक विशाल तांबे, योगेश ससाणे, भैय्यासाहेब जाधव सहभागी झाले होते.
सोशल मिडीयात अत्यंत सक्रीय असलेल्या महापौरांनी अवघ्या 20 मिनिटे अगोदर पत्रकार परिषदांची निमंत्रणे व्हाटसेप च्या ग्रुप वरून पाठ्विली. आणि पत्रकार परिषदेतून सांगितले कि , अगोदरच सभेची वेळ स्थळ ठरले होते. शासनाचे आदेश आज सकाळी मिलाळ्याने दुपारची 3 वाजताची सभा महापौर दालनाच्या शेजारी असलेल्या सभागृहात होईल असा बदल त्यांना कळविणे शक्य नव्हते. विरोधकांचे वर्तन बेजबाबदार पणाचे आहे असं म्हणत नगरविकास खात्याने फक्त पुण्यासाठीच आदेश कसा काय काढला असा प्रश्न महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारला. ” सभा घ्यायचीच तर मुंबईसह इतर महापालिकांची का घेतली जात नाही? मुॅबईची सभा चालवु देत नाहीत मग फक्त पुण्यासाठीच आदेश का निघतो ?” असं मोहोळ म्हणाले.