दत्तवाडी पोलीसांची कारवाई पुणे-: खुनाच्या प्रयत्नासह दरोड्याच्या गुन्हयातील मुख्य आरोपी असलेल्या दयानंद ऊर्फ गौतम देवेंद्र साळुंके (वय २० वर्षे, रा.सर्व्हे नं ३५१ सातीआसरा झोपडपट्टी, दत्तवाडी पुणे -३०)याला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तवाडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे व त्यांचा स्टाफ असे दत्तवाडी पो.स्टे.हद्दीमध्ये गणपती बंदोबस्त करताना तसेच गु . र . नं . २०३ / २०२२ भा.द.वि. कलम ३ ९ ७,३४ मधील पाहिजे आरोपी नामे गौतम साळुंके याचा शोध घेत असताना, पाहिजे आरोपी हा सराईत असल्याने पोलीसांना वारंवार गुंगारा देत होता,पोलीस हे बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे पुणे,सोलापुर भिगवण ,बारामती धायरी परिसरामध्ये वेगवेगळी पथके बनवुन गुन्हा घडल्यापासुन तपास करत होते.त्यादरम्यान दत्तवाडी पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे दयानंद तेलंगे,सद्दाम शेख यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त झाली की,सदर आरोपी त्याच्या मित्राला भेटण्यासाठी पुण्यात येणार असुन त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत कामठे व तपास पथकातील कर्मचारी यांनी दत्तवाडी राजाराम पुल येथे धायरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावुन गुन्हयातील सध्या पाहिजे आरोपी व मुख्य सुत्रधार आरोपी नामे दयानंद ऊर्फ गौतम देवेंद्र साळुंके वय २० वर्षे,रा.सर्व्हे नं ३५१ सातीआसरा झोपडपट्टी,दत्तवाडी पुणे -३० याला दि ३०/०८/२०२२ रोजी २२/०० वा ताब्यात घेतले,नमुद आरोपीकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने नुकतेच महिनाभरापूर्वी प्रेमविवाह केला असुन त्यामुळे झालेल्या कर्जबाजारीपणातुन मुक्त होण्याकरीता त्याच्या नेहमीच्या ओळखीचे वर नमुद फिर्यादी यांना लुटण्याचा कट करुन त्याचा साथीदार नामे आशिष जितेंद्र दुबे,वय २१ वर्षे रा.९९९ दत्तवाडी पुणे याचेसह मिळुन गुन्हा केल्याचे कबुल केले,त्याच्या साथीदारास यापुर्वीच दत्तवाडी पोलीसांनी अटक केलेले आहे.नमुद गुन्हयातील २ लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन आरोपीचे धायरी येथील राहते घरातुन जप्त करण्यात आलेली असुन गुन्हा उघडकीस आणला आहे.यातील दयानंद ऊर्फ गौतम देवेंद्र साळुंखे हा पोलीसांचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापूर्वी कोथरुड पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.पुढील तपास पोउपनि श्री चंद्रकांत कामठे हे करीत आहेत.सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे,पोलीस उप – आयुक्त सो परि -३ मा .पौर्णिमा गायकवाड, सहा पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग सुनिल पवार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन,पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे,पोहवा.कुंदन शिंदे,पोना अमित सुर्वे,प्रकाश मरगजे, पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे,दयानंद तेलंगे – पाटील,अनिस तांबोळी,अमित चिव्हे,पुरुषोत्तम गुन्ला,प्रमोद भोसले,अमोल दबडे, नवनाथ भोसले,किशोर वळे यांनी केलेली आहे.