पालकमंत्र्यांनी खासदारांशी ही संवाद साधायला हवा होता – स्थायी अध्यक्ष रासने (व्हिडीओ)
पुणे- खा.बापटांनी कोरोना लढाईतील त्रुटींकडे लक्ष वेढले असून आम्ही महापालिका स्तरावर त्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत असे सांगत राज्य सरकारने पुण्यातील कोरोना विरोधातील लढाईत नियुक्त केलेल्या ७ आय ए एस अधिकार्यांची नियुक्ती केली .महापौरांशी पालकमंत्री यांचा संपर्क असणे चांगली बाब आहे त्यांनी अनेकदा बैठका घेतल्या पण पुण्याचे ज्येष्ठ अनुभवी नेते असलेले खासदार गिरीश बापट यांना निमंत्रित केले नाही ते करायला हवे होते असे सांगत महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी कॉंग्रेस ,राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी बापट यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे .नेमके रासने यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात ….
https://youtu.be/ZB7EQULVxoM