पुणे- महापालिकेच्या शिवशंकर पोटे दवाखाना, पद्मावती येथे दुसऱ्या टप्प्यामध्ये ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना व ४५ ते ६० वयोगटातील आजार असणाऱ्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे.
त्याप्रमाणे सकाळी पोटे दवाखान्यातील सर्व महापालिका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय सेवक व कर्मचारी वर्गासोबत लसीकरणाच्या कामकाजाची सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी एकत्र येऊन दिवसभरातील नियोजना करिता नगरसेविका अश्विनी कदम यांनी सर्व आरोग्य कर्मचारी व नागरिकांशी चर्चा केली. हि सर्व यंत्रणा सुरळीत लावताना सुरवातीला काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले व त्यामुळे दुपारी उशिरा कोविड-१९ लसीकरणाचे पोर्टल लसीकरणासाठी चालू झाले.
दुपारी १:०० वाजल्यानंतर ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत एकूण फ़क्त ४२ नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. हे सर्व कामकाज पूर्ण करताना अशाप्रकारे लसीकरणाचा पहिला दिवस धावपळ,नियोजन व व्यवस्थापनात सत्कारणी लागला. असे नगरसेविका अश्विनी कदम म्हणाल्या.
पहिल्या दिवशी ज्यांची कोविन ॲपवर नोंदणी झाली आहे,अशा अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने लसीकरण केंद्राला भेट दिली. परंतु पोर्टल अभावी बऱ्याच नागरिकांना परत जावे लागले.
एकूण दिवसभरातील अनुभव पाहता,कोविड-१९ लसीकरण सुरळीत पार पाडण्यासाठी खूप मोठ्या शिस्तबद्ध नियोजनाची नितांत आवश्यकता आहे.तसेच शांतता व संयमाची देखील तितकीच गरज आहे.त्याचप्रमाणे येणारे नागरिक हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि एकदा लसीकरण केंद्रावर आल्यानंतर सदरच्या कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव परिस्थिती मध्ये त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागावे, हे कधीच योग्य होऊ शकत नाही. अशा परिस्थितीतही, लसीकरण पोर्टल च्या संदर्भातील तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.प्रत्येक व्यक्तीला लागणारा दहा ते पंधरा मिनिटे वेळ विचारात घेता, दिवसभरात १ तासामध्ये ६ ते ७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण होते. म्हणजेच दिवसात सकाळी ९:०० ते ५:०० या वेळेमध्ये ५० ते ६० नागरिकांचे लसीकरण होऊ शकते.जर असे असेल तर प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.जरी लस देण्यासाठी डॉक्टर्स व नर्सचा स्टाफ उपलब्ध झाला, तरी देखील लसीकरणामध्ये पोर्टल यंत्रणा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
आजचा दिवसभरातील अनुभव सांगता नागरिकांनी ,कोणीही कसलीही काळजी करू नका पुणे शहरातील सर्व वैद्यकीय प्रशासकीय यंत्रणा पुढील ३-४ दिवसांमध्ये येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढत,सुरळीत कामाजासाठी सज्ज असेल. सर्वानी दैनंदिन सूचना व नियमांचे योग्य पालन केल्यास व प्रत्येक ठिकाणच्या लसीकरण केंद्राला योग्य सहकार्य केल्यास नक्कीच आपण कमी कालावधीमध्ये सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात यशस्वी होऊ असे आवाहन कदम यांनी केले आहे.