नेमके खरे कोण ? मेट्रो अधिकारी,महापौर कि उपमुख्यमंत्री ? संभाजी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंचीचा प्रश्न
पुणे- संभाजी पुलावरून नदीवरून पुढे जाण्यासाठी होत असलेला मेट्रोचा पूल हा विसर्जन मिरवणुकीला अडथला ठरेल अशी हरकत घेऊन आंदोलने सुरु झाल्यानंतर महापौरांनी मेट्रो च्या अधिकाऱ्याने त्यांना पाठवलेले पत्र पुढे करून या पुलाचे काम विरोध होत असेल तर पोलीस बंदोबस्तात करा असे आदेश उपमुख्यमंत्री असलेले आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनीच दिले असल्याचे स्पष्ट केले आणि हे आंदोलन हा विरोध आम्ही लक्षात घेण्याची गरज नाही असे प्रतिपादित केले होते . पण आज यावर पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता , लकडी पुलावरील मेट्रो पुलाविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केलेले असताना या पुलाचे काम सुरु झालेय याकडे लक्ष वेधले असताना पवार यांनी ,आपल्याला या संदर्भात काहीही माहिती नाही, माहिती घेतो , आणि पुढील ५० वर्षे डोळ्यापुढे ठेऊन आपण निर्णय घेत असतो असे स्पष्ट केल्याने आता या विषयावर पुन्हा एकदा चर्चा उसळली आहे. महापौरांनी , मेट्रोच्या गाडगीळांच्या पत्राचा हवाला देऊन अजित पवारांनीच हे काम पोलीस बंदोबस्तात सुरु करा म्हणून आदेश दिल्याचे स्पष्ट केले आणि हे काम सुरु झाल्याचे निदर्शनास आणताच अजित पवारच मला माहिती नाही माहिती घेतो असे म्हणतात. यावरून नेमके खरे काय आणि खोटे काय ? अशी संदिग्धता पसरते आहे .