पुणे-संपूर्ण देशाला कोरोनाची पहिली लस (कोव्हिशील्ड) देणाऱ्या पुण्यातही सकाळी साडे दहापासून 8 ठिकाणांवर लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.’कोव्हिशील्ड’ची निर्माता अर्थात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनीही आज लसीचा डोस घेतला आहे आज पुणे शहरात 8 आणि संपूर्ण जिल्ह्यात 31 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये डॉ. नानेश वाडेकर यांनी सर्वात पहिले लस घेतली.
आदर पूनावाला यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरलस घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.