कोरोना-लॉक डाउन च्या काळात सरकारने ही केली लूट
पुणे : गेल्या मार्च पासून लोकांचे उतपन्न, कमाई,नौकरी,धंदा धोक्यात आल्याने प्रचंड नुकसान सहन करत लोक कसे बसे जगत आहेत, या काळात अनेकांनी भाव, दर वाढ मनमानी करत लूट केली आहे खुद्द सरकार ही यात मागे राहिलेले नाही त्यांनी चार महिन्यात पेट्रोलवर 16 रुपये तर डिझेलवर 19 रुपयांचा कर वाढवला आहे.सध्या राज्यात पेट्रोलची मूळ किंमत 24.62 रुपये आहे. त्यावर केंद्र सरकारचे 32.98 तर राज्य सरकारचा 25.30 रुपये कर आकारण्यात येत आहे तर डीलरच्या कमिशन पोटी 3.16 वाहनचालकांना मोजावे लागत आहेत. डिझेलची मूळ किंमत 26.4 रुपये असून केंद्राचा 31.83 आणि राज्य सरकारचा 17.5 रुपये कर तर 2.53 रुपये डीलरचे कमिशन घेतले जात आहे. एकाच वस्तूसाठी वेगवेगळे कर भरावे लागत असल्याने व त्याची टक्केवारी देखील मोठी असल्याने इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याच्या नुसत्या पोकळ चर्चा होत आहेत. मात्र कोणतेही सरकार याबाबत ठोस भूमिका घेत नसून त्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध करांमुळे इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल जर जीएसटीच्या अंतर्गत आले राज्यातील त्याच्या किमती निम्म्याने कमी होतील.पण याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही .पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत आले तर मूळ किमतीवर 28 टक्के पेक्षा जास्त कर लावता येणार नाही. त्यामुळे मूळ किंमत 24.62 रुपये प्रति लिटर पेट्रोलवर 28 टक्के जीएसटी लावला तर त्याची किंमत 31.51 रुपये होते. तर डिझेल 33.33 रुपये प्रति लिटर होईल.