पुणे- चाटे पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. फुलचंद चाटे सर यांनी शिक्षकांची जबाबदारी आणि आजचा विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन केले
यावेळी प्रा. चाटे म्हणाले की कोविडच्या अगोदरचा विद्यार्थी वेगळा होता, विद्यार्थी वर्गात बसून शिक्षकांचे त्याच्यावर नियंत्रण होते, तो काय करतो,कसा लिहितो, त्याचे अक्षर सुंदर आहे का? त्याचे लक्ष अभ्यासा मध्ये आहे का? यावर शिक्षकांचे बारीक लक्ष असायचे परंतु या मागील काळात कोविडमुळे सर्व शाळा बंद झाल्या आणि जो विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होता, शिक्षकासमोर बसून अभ्यास करत होता हे सर्व बंद झाले आणि विद्यार्थी सुद्धा अभ्यासापासून दूर गेले.
आपल्या विद्यार्थ्याला बदलत्या परिस्थितीनुसार बदलले पाहिजे परंतु हा ऑनलाईन शिक्षणाचा बदल एकाएकीच होणार नाही ,तो होईल पण जरा वेळ जाईल.सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना होईल तेवढा वेगवेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे जर विद्यार्थ्यांना वेळ दिला नाही तर नक्कीच विद्यार्थ्यांची एक पिढी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये पहिली ते बारावी हेच शिक्षणाचे महत्त्वाचे वर्ष मानले जातात,पहिली ते सातवी मध्ये शीस्त,संस्कार, योग्य व अयोग्य या गोष्टीचे खूप महत्त्व जाणून द्यावे लागते हे सर्व आई वडील आणि शिक्षक यांनी सांगावे लागते यांनी जर या गोष्टीची जाणीव नाही करून दिली तर कोण देणार.आठवी ते बारावी करियर कोणत्या क्षेत्रात करावे त्यासाठी अभ्यासाचे महत्त्व स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी शिक्षकांचे पालकांचे योग्य मार्गदर्शन कोणत्या क्षेत्रांमध्ये चांगल्या संधी आहेत हे सर्व या वर्षात जाणीव करून द्यावे लागते.
शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी प्राध्यापक चाटे सर यांनी अनेक विषयावर प्रकाश टाकला. यावेळी सांगितले की विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये अभ्यास इतका महत्वाचा आहे की ज्या प्रमाणे माणसाची सावली माणसाची कधीही साथ सोडत नाही त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कधीही साथ सोडली नाही पाहिजे.विद्यार्थ्याने आई-वडिलांच्या स्वप्नांसाठी मेहनत केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी काळानुसार बदलले पाहिजे पुस्तकाशी मैत्री केली पाहिजे आणि हे सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे आणि ही जबाबदारी चाटे पब्लिक स्कूल समर्थपणे पार पाडण्यास सक्षम तयार आहे आणि तशीच वाटचाल करत आहे.आज चाटे पब्लिक स्कूल चा विद्यार्थी दिशाहीन मेहनत करणार नाही त्याची दिशा स्पष्ट असेल त्याची दिशा ठरलेली असेल आणि तो नक्कीच त्याच्या धेय्या पर्यंत पोहोचेल यावेळी कार्यक्रमांमध्ये वैशाली चाटे मुख्याध्यापिका मीकीता काळे, नवनीत राजपाल, श्री मोहोरकर , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.