पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आजी-माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या ऑनलाइन स्नेह-मेळाव्याने करण्यात आला.
डीईएसच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. डीईएसचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, सदस्य डॉ. आशिष पुराणिक, शाळा समितीचे अध्यक्ष ऍड. अशोक पलांडे, प्रभारी मु‘याध्यापक दीलीप रावडे, माजी मु‘याध्यापक सुदाम मुंडे, भालचंद्र पुरंदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाविन्यपूर्ण बदल स्वीकारल्याने डीईएसच्या विविध घटक संस्था यशस्वी वाटचाल करीत असल्याचे मत डॉ. केळकर यांनी व्यक्त केले. ऍड. पलांडे यांनी ७५ वर्षांतील कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या कार्याचा आढावा घेतला. रमणबागेतील शिक्षकांनी ज्ञानाचे उपयोजन करून संशोधनातून समाजसेवा करणारे विद्यार्थी घडवावे असे मत मुंडे यांनी व्यक्त केले. करोना पश्चात विद्यार्थ्यांना मानसिक समुपदेशन करण्याच्या उद्देशाने केंद्र सुरू करावीत अशी सुचना पुरंदरे यांनी केली.
प्रशालेचा विद्यार्थी तनय नाझीरकर याने ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले. मु‘याध्यापक दीलीप रावडे यांनी प्रास्ताविक, उपमु‘याध्यापिका अर्चना पंच यांनी परिचय, चारुता प्रभूदेसाई यांनी सूत्रसंचालन आणि पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार यांनी आभार प्रदर्शन केले.