पुणे- आज भाजपच्या युवा मोर्चा चे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी घेराव घालण्यात आला.कोणत्याही संस्थेच्या संबंधात काही तक्रार आम्हाला प्राप्त झाल्यास आपल्या विरोधात नाईलाजाने आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी पुणे शहरातील आठही मतदार संघांशिक्षण संस्थांना देण्यात आला . या वेळी पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस – प्रतीक देसरडा, अभिजीत राऊत, अक्षय वायाळ, दीपक पवार, राजू परदेशी, सुनिल मिश्रा, करण मिसाळ, ओंकार केदारी, सोशल मीडिया संयोजक – कनद आफळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या ‘या’ मागण्यांसाठी घातला घेराव
- कोणत्याही विद्यार्थ्यांना फक्त फी न भरल्याच्या कारणास्तव शैक्षणिक फायद्यापासून वंचित ठेवले जाऊ नये.
- फी भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी निर्दिष्ट केल्याप्रमाणे सुलभ हाफ्याने फी भरण्याची मुभा मिळावी.
- उशिरा फी भरणार्या पालकांवर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक दंड आकारू नये.
- ऑनलाईन क्लासरूम मधुन विद्यार्थ्यांंना काढले जाऊ नये (यामुळे विद्यार्थ्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होत आहे.)
- ज्या सुविधांचा वापर या वर्षात झालेला नाही त्याबाबत कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारले जाऊ नये. ( उदा. ग्राउंड शुल्क, कॉम्प्युटर लॅब शुल्क वैगेरे.)
- शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्याची गुणपत्रिका तसेच शाळा सोडल्याचा दाखला अडवणे असे प्रकार होणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी.
- गेल्या १ वर्षात यदाकदाचित आपल्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याच्या घरातील कर्ता पुरुष covid मधे वारले असतील अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात यावी.