पुणे: आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेच्या वतीने आयोजित आठव्या बीस्मार्ट सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2021 स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत रॉयल्स, बीस्मार्ट, एसआरपीए इलेव्हन, चॅम्प्स सुपर किंग्ज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
कटारिया हायस्कुल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत साहिल पारख(नाबाद 37धावा व 1-10) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बीस्मार्ट संघाने पीएचएम टायगर्स संघाचा 10 गडी राखून पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना पीएचएम टायगर्स संघाला 8षटकात 3बाद 61धावाच करता आल्या. यात यश सोनी नाबाद 21, रुद्रानग बेलसरे 16, अक्षय ओक नाबाद11 यांनी धावा केल्या. बीस्मार्टकडून साहिल पारख(1-10), किशन जैन(1-5)यांनी अचूक गोलंदाजी केली. हे आव्हान बीस्मार्ट संघाने 5.3षटकात एकही गडी न गमावता 62धावा करून पूर्ण केले. यामध्ये साहिल पारखने 22 चेंडूत 3चौकरांसह नाबाद 37धावा व रघु कडगीने 11 चेंडूत नाबाद 18 धावा काढून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
अमित बलदोटा(नाबाद76धावा व 1-20)याने केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर चॅम्प्स सुपर किंग्ज संघाने पेशवा सुपर किंग्ज संघाचा 41धावांनी पराभव केला. सौरभ सोनीच्या(नाबाद 60)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल्स संघाने सीए टायटन्स संघाचा 67धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. एसआरपीए इलेव्हन संघाने व्हीकेजी स्मॅशर्स संघाचा 8 धावांनी पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:रॉयल्स: 8षटकात 1बाद 117धावा(सौरभ सोनी नाबाद 60(26,3×4,5×6), कुणाल झामवर नाबाद 42(17,3×4,1×6), यश बोरा 1-17)वि.वि.सीए टायटन्स: 8षटकात 9बाद 50धावा(दिपक दौलतानी 12, सागर ढवळे 3-11, कुणाल झामवर 1-9);सामनावीर-सौरभ सोनी; रॉयल्स संघ 67धावांनी विजयी;
एसआरपीए इलेव्हन: 8षटकात 5बाद 93धावा(अमन अगरवाल 47(20,3×4,4×6), सागर संकलेचा 24, प्रणव गुप्ता 2-13)वि.वि.व्हीकेजी स्मॅशर्स: 8षटकात 5बाद 85धावा(चंकित धनुका 40(19,2×4,1×6), आकाश भटवेरा नाबाद 32(18,1×4,2×6), आनंद डायमा 2-21, सागर संकलेचा 2-14);सामनावीर-सागर संकलेचा; एसआरपीए इलेव्हन संघ 8धावांनी विजयी;
चॅम्प्स सुपर किंग्ज: 8षटकात 2बाद 126धावा(अमित बलदोटा नाबाद 76(24,4×4,6×6), नागेश जाधव 31(18), भूषण लोखंडे 1-19)वि.वि.पेशवा सुपर किंग्ज: 8षटकात 4बाद 85धावा(चिन्मय बीडकर नाबाद 30(12), संकेत चव्हाण 20, विवेक बाज 2-23, अमित बलदोटा 1-20);सामनावीर-अमित बलदोटा; चॅम्प्स सुपर किंग्ज संघ 41धावांनी विजयी;
पीएचएम टायगर्स: 8षटकात 3बाद 61धावा(यश सोनी नाबाद 21(16), रुद्रांग बेलसरे 16, अक्षय ओक नाबाद11, साहिल पारख 1-10, किशन जैन 1-5)पराभूत वि. बीस्मार्ट: 5.3षटकात बिनबाद 62धावा(साहिल पारख नाबाद 37(22,3×4), रघु कडगी नाबाद 18(11,1×4,1×6));सामनावीर-साहिल पारख; बीस्मार्ट संघ 10 गडी राखून विजयी.