पुणे, 19 जानेवारी 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम 3 करंडक आंतर क्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत गटसाखळी फेरीत युनायटेड स्पोर्ट्स क्लब, डेक्कन जिमखाना, केडन्स क्रिकेट अकादमी आणि क्लब ऑफ महाराष्ट्र या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.
पीवायसी हिंदू जिमखाना,डेक्कन जिमखाना, डीव्हीसीए व पुना क्लब मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत चुरशीच्या झालेल्या लढतीत संकेत यशवंती (4-31 व नाबाद 22) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 1 गडी राखून पराभव करत धडाकेबाज सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघ 38.1 षटकात 138 धावावर संपुष्टात आला. यात अखिलेश गवळी 28, अमेय भावे 23, यश माने 21, आदित्य डावरे 17 यांनी धावा केल्या. युनायटेड स्पोर्ट्स क्लबकडून संकेत यशवंतीने अचूक गोलंदाजी करत 31 धावात 4महत्वपूर्ण गडी बाद केले. संकेतला अद्वैय सिधये 12 धावात 2 गडी तर, आनंद ठेंगे(1-27), आदित्य मोरे(1-27) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून सुरेख साथ दिली. याच्या उत्तरात युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने 33.5षटकात 9बाद 139धावा करून हे आव्हान पूर्ण केले. सलामीची जोडी आदित्य राजहंस(22धावा) व अद्वैय शिधये(22धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 47चेंडूत 48धावांची भागीदारी करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. हे दोघेही बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज फारशी मोठी खेळी करू शकले नाहीत. त्यानंतर संकेत यशवंती याने पुन्हा एकदा गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीतही कमाल दाखवत नाबाद 39चेंडूत 3चौकारांसह 22धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी संकेत यशवंती ठरला. दुसऱ्या सामन्यात अजय बोरुडे(3-34 व 32धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने अँबिशियस क्रिकेट अकादमीचा 4 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना अँबिशियस क्रिकेट अकादमीचा डाव 45षटकात 211धावावर संपुष्टात आला. यात तनिश जैन याने धडाकेबाज फलंदाजी करताना 114चेंडूत 15चौकार व 1षटकारांच्या मदतीने 107धावांची शतकी खेळी केली. त्याला सिद्धांत दोशी 33, ऋषिकेश बारणे 18, व्यंकटेश दराडे 19यांनी धावा काढून सुरेख साथ दिली. डेक्कन जिमखाना संघाकडून अजय बोरुडे(3-34), यश बोरामणी(3-37), धीरज फटांगरे(2-38), प्रज्वल मुंगरे(1-37) यांनी भेदक गोलंदाजी केली. हे आव्हान डेक्कन जिमखाना संघाने 44षटकात 6बाद 214धावा करून पूर्ण केले. यामध्ये स्वप्निल फुलपगार 51, शुभांकर हर्डीकर नाबाद 36, यश बोरामणी 36, अजय बोरुडे 32, आत्मन पोरे नाबाद 23 यांनी धावा काढून संघाचा विजय सुकर केला. अष्टपैलू कामगिरी करणारा अजय बोरुडे सामन्याचा मानकरी ठरला.
अन्य लढतीत इझान सय्यद(2-23) याने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने पूना क्लब संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजयी सुरुवात केली. अतुल विटकर याने केलेल्या नाबाद 60 धावांच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा 4गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.
स्पर्धेचे उदघाटन महादेव जाधव, नंदन ठाकूर आणि पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी क्रिकेटपटू अविनाश जाधव, पाथ-वे फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव, 19 वर्षाखालील भारतीय संघातील माजी खेळाडू काशिनाथ खडकीकर आणि पाथ-वे फाउंडेशन सचिव सिद्धार्थ निवसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
पीवायसी क्रिकेट मैदान: पीवायसी हिंदू जिमखाना: 38.1 षटकात सर्वबाद 138 धावा(अखिलेश गवळी 28(40,4×4), अमेय भावे 23(32,2×4,1×6), यश माने 21(33,1×4,1×6), आदित्य डावरे 17, संकेत यशवंती 4-31, अद्वैय सिधये 2-12, आनंद ठेंगे 1-27, आदित्य मोरे 1-27) पराभूत वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 33.5षटकात 9बाद 139धावा(आदित्य राजहंस 22(49,3×4,1×6), अद्वैय शिधये 22(20,4×4), महेश मस्के 26(29,3×4,1×6), संकेत यशवंती नाबाद 22(39,3×4), यश खळदकर 4-21, यश माने 2-11, साहिल चुरी 1-25, आदित्य डावरे 1-29);सामनावीर-संकेत यशवंती; युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघ 1 गडी राखून विजयी;
डेक्कन जिमखाना मैदान: अँबिशियस क्रिकेट अकादमी: 45षटकात सर्वबाद 211धावा(तनिश जैन 107(114,15×4,1×6), सिद्धांत दोशी 33(52,5×4), ऋषिकेश बारणे 18, व्यंकटेश दराडे 19, अजय बोरुडे 3-34, यश बोरामणी 3-37, धीरज फतंगरे 2-38, प्रज्वल मुंगरे 1-37) पराभूत वि.डेक्कन जिमखाना: 44षटकात 6बाद 214धावा(स्वप्निल फुलपगार 51(46,6×4), शुभांकर हर्डीकर नाबाद 36(57,2×4,1×6), यश बोरामणी 36(66,3×4), अजय बोरुडे 32(32,4×4,1×6), आत्मन पोरे नाबाद 23(27,2×4), तनिश जैन 3-32, वैभव विभुते 1-43, सरिश देसाई 1-36, व्यंकटेश दराडे 1-14);सामनावीर-अजय बोरुडे; डेक्कन जिमखाना 4 गडी राखून विजयी;
डीव्हीसीए मैदान: व्हेरॉक क्रिकेट अकादमी:31.3 षटकात सर्वबाद 149 धावा(मिझान सय्यद 46(57,5×4), ओंकार राजपूत 26(29,1×4,2×6), तिलक जाधव 26(43,4×4), सौरभ नवले 13, प्रज्वल गुंड 3-46, वैभव गोसावी 2-28, राजवर्धन उंडरे 2-5, अतुल विटकर 1-15) पराभूत वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 31.3lषटकात 6बाद 152धावा(राजवर्धन उंडरे 38(63,4×4,1×6), अतुल विटकर नाबाद 60(55,9×4, 1×6), यश क्षिरसागर 19(30,3×4), अद्वैत मुळ्ये 15, ओंकार राजपूत 2-7, राहुल वारे 2-25, मनोज यादव 1-14);सामनावीर-अतुल विटकर; क्लब ऑफ महाराष्ट्र संघ 4गडी राखून विजयी;
पूना क्लब मैदान: पूना क्लब: 40षटकात 9बाद 178धावा(आर्यन गाडगीळ 30(49,3×4), वरद कुलकर्णी 22(52,2×4), सागर मलपती 22(22,1×4,2×6), राजकुमार चौहान 17, अक्षय खोपडे 18, कन्हैया लड्डा 14, आर्य जाधव 3-49, इझान सय्यद 2-23,सिद्धेश वरघंटी 2-50) पराभूत वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 26.5 षटकात 4बाद 180धावा(हर्षल काटे नाबाद 50(48,5×4,1×6), कौशल तांबे नाबाद 53(46,8×4), अथर्व काळे 32(21,4×4,2×6), अर्शीन कुलकर्णी 18, विशाल गायकवाड 2-33, राजकुमार चौहान 1-34, अमेय मुजुमदार 1-55);सामनावीर-इझान सय्यद ; केडन्स क्रिकेट अकादमी 6 गडी राखून विजयी.