महिला स्नूकर गटात अमी कमानी व विद्या पिल्लई यांचा अंतिम फेरीत प्रवेश
पुणे: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ पुरुष स्नूकर गटात पंकज अडवानी, आदित्य मेहता यांनी अनुक्रमे लक्ष्मण रावत व पुष्पेंदर सिंग यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीतचुरशीच्या झालेल्या लढतीत 23वेळा जागतिक विजेतेपद पटकावणाऱ्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या पंकज अडवानी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत माजी जागतिक सिक्स रेड स्नूकर विजेत्या पीएसपीबीच्या लक्ष्मण रावतचा (5-3){41-75, 31-85(59), 51-73, 82-01, 86-40, 71-17, 60-00, 62-04} असा संघर्षपूर्ण पराभव करुन दिमाखात अंतिम फेरी गाठली. 3तास 30मिनिटे चाललेल्या लढतीत लक्ष्मण याने सुरेख सुरुवात करत पहिली फ्रेम पंकजविरुद्ध 75-41 जिंकून आघाडी घेतली. त्यानंतरही लक्ष्मण याने आपला रंगतदार सुरु ठेवत पुढील दोन्ही फ्रेम 85(59)-31, 73-51 अशी जिंकून आघाडी कायम ठेवली. पिछाडीवर असलेल्या पंकज याने आपले अनुभव व कौशल्याचा वापर करत चौथी व पाचवी फ्रेम लक्ष्मणविरुद्ध 82-01, 86-40 अशी जिंकून हि आघाडी कमी केली. पंकज याने आपली विजयी खेळी सुरु ठेवत पुढील फ्रेम 86-40, 71-17, 60-00, 62-04 अशा जिंकून विजय मिळवला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पीएसपीबीच्या आदित्य मेहता याने आरएसपीबीच्या पुष्पेंदर सिंग याचा (5-3){165-22, 35-70, 51-65, 66(66)-12, 15-111(65), 64-15, 76(69)-01, 66-24 } असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
वरिष्ठ स्नूकर महिला गटात उपांत्य फेरीत मध्यप्रदेशच्या अमी कमानी याने कर्नाटकच्या वर्षा संजीवचा 3-1{64-37, 71-43, 19-53, 69(39)-23 } असा तर, कर्नाटकाच्या विद्या पिल्लई हिने तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रनचा (3-0){86(33)-09, 70-44, 60-45} असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: वरिष्ठ स्नूकर पुरुष: उपांत्य फेरी:
पंकज अडवानी(पीएसपीबी)वि.वि.लक्ष्मण रावत(पीएसपीबी) (5-3){41-75, 31-85(59), 51-73, 82-01, 86-40, 71-17, 60-00, 62-04};
आदित्य मेहता(पीएसपीबी)वि.वि.पुष्पेंदर सिंग(आरएसपीबी)(5-3){165-22, 35-70, 51-65, 66(66)-12, 15-111(65), 64-15, 76(69)-01, 66-24 }
वरिष्ठ स्नूकर महिला: उपांत्य फेरी:
अमी कमानी(मध्यप्रदेश)वि.वि.वर्षा संजीव(कर्नाटक)3-1{64-37, 71-43, 19-53, 69(39)-23 };
विद्या पिल्लई(कर्नाटक)वि.वि.अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)(3-0){86(33)-09, 70-44, 60-45 }