पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट प्रायोजित पहिल्या पीवायसी-बीकेटी निमंत्रित निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर कोल्हापूरच्या सम्मेद शेटे, मुंबईच्या केतन बोरीचा या खेळाडूंनी 5 गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे.
पीवायसी बुद्धिबळ अकादमी, पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सहाव्या फेरीत कोल्हापूरच्या सम्मेद शेटे याने आपली विजयी मालिका कायम ठेवत मुंबईच्या वेदांत पानेसरचा पराभव करून 5गुण प्राप्त केले. मुंबईच्या केतन बोरीचा याने आपला शहर सहकारी संजीव नायरचा 5गुणांसह आघाडी मिळवली.
पुण्याच्या एफएम अनिरुद्ध देशपांडे याने अहमदनगरच्या एफएम सुयोग वाघला बरोबरीत रोखले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सहावी फेरी(व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार):
वेदांत पानेसर(मुंबई)(4.5गुण) पराभूत वि.सम्मेद शेटे(कोल्हापूर)(5गुण);
एफएम अनिरुद्ध देशपांडे(पुणे)(4.5गुण) बरोबरी वि.एफएम सुयोग वाघ(अहमदनगर)(4.5गुण);
केतन बोरीचा(मुंबई)(5गुण) वि.वि.संजीव नायर(मुंबई)(3.5गुण);
रणवीर मोहिते(पुणे)(4गुण) बरोबरी वि.शंतनू भांबुरे(पुणे)(4गुण);
प्रणव शेट्टी(मुंबई)(3गुण) पराभूत वि.आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(मुंबई)(4गुण);
आयएम समीर कठमाळे(सांगली)(4गुण) वि.वि.विकास शर्मा(पुणे)(3गुण);
कशिश जैन(पुणे)(3.5गुण) बरोबरी वि.एफएम निखिल दीक्षित(पुणे)(3.5गुण);
जीत शहा(मुंबई)(3.5गुण) बरोबरी वि.शिव शोमी(मुंबई)(3.5गुण);
सोहम दातार(पुणे)(4गुण) वि.वि.स्नेहल भोसले(मुंबई)(3गुण);
डब्ल्यूआयएम सलोनी सापळे(पुणे)(3.5गुण) बरोबरी वि. सीएम ओम कदम(मुंबई)(3.5गुण).