पुणे : आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेतर्फे आयोजीत सातव्या गोवर्धन सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2020 स्पर्धेत पीएचएम टायगर्स, बीस्मार्ट, रॉयल्स, सीए स्पार्टन्स, आयसीएएन , एसबीएच स्मॅशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
कटारिया हायस्कुल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत अभिषेक खांबेटे नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर पीएचएम टायगर्स संघाने सीए चॅम्प्स संघाचा 11 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना पीएचएम टायगर्स संघाने 8 षटकात 1 बाद 96 धावा केल्या. यात अभिषेक खांबेटेने नाबाद 52 तर रूद्रांगने 38 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. 96 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शाल्वा कर्वेच्या अचूक गोलंदाजीने सीए चॅम्प्स संघाचा डाव 8 षटकात 8 बाद 85 धावांत रोखला. अभिषेक खांबेटे सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत वंदीत सबलोकच्या दमदार 41 धावांच्या बळावर आयसीएएन संघाने इवाय वॉरियर्स संघाचा 41 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना वंदीत सबलोकच्या 41 व हरप्रीत सरनच्या 46 धावांसह आयसीएएन संघाने 8 षटकात 3 बाद 106 धावांचा डोगर रचला. 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इवाय वॉरियर्स संघ 8 षटकात 6 बाद 65 धावांत गारद झाला. वंदीत सबलोके सामनावीर ठरला.
अन्य लढतीत किशन जैनच्या अषटपैलू खेळीच्या जोरावर बीस्मार्ट संघाने प्रास इलेव्हन संघाचा सर्व 10 गडी राखून दणदणीत पराभव केला. तर एसबीएच स्मॅशर्स संघाने सी अँड एल स्ट्रायकर्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगोकुच केली. सीए स्पार्टन्स संघाने सीए सुपरकिंग्ज संघाचा 3 धावांनी तर रॉयल्स संघाने सीए चॅम्प्स संघाचा 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
पीएचएम टायगर्स- 8 षटकात 1 बाद 96 धावा(अभिषेक खांबेटे नाबाद 52(26), रूद्रांग 38(22), विवेक बाज 1-14) वि.वि सीए चॅम्प्स- 8 षटकात 8 बाद 85 धावा (अमित बलबोटा 34(19), अमोल कुलकर्णी 27(11), शाल्वा कर्वे 3-7) सामानावीर- अभिषेक खांबेटे
पीएचएम टायगर्स संघाने 11 धावांनी सामना जिंकला.
प्रास इलेव्हन- 8 षटकात 5 बाद 86 धावा (अभिजीत एम 23(11), जयेश राजपाल नाबाद 15(7), अदित्य शितोळे नाबाद 28(10), हर्षल नायडू 2-15, चेतन गांधी 2-22) पराभूत वि बीस्मार्ट – 4.5 षटकात बीनबाद 91 धावा(चेतन गांधी नाबाद 28(14), किशन जैन नाबाद 39(15)) सामनावीर- किशन जैन
बीस्मार्ट संघाने 10 गडी राखून सामना जिंकला.
आयसीएएन- 8 षटकात 3 बाद 106 धावा(वंदीत सबलोक 41(25), हरप्रीत सरन 46(19), ऋषभ भंडारी 1-24) वि.वि इवाय वॉरियर्स- 8 षटकात 6 बाद 65 धावा (संकेत 25(11), चंद्रप्रकाश 21(17), सौरभ डागा 2-10) सामनावीर- वंदीत सबलोके
आयसीएएन संघाने 41 धावांनी सामना जिंकला
सी अँड एल स्ट्रायकर्स- 8 षटकात 7 बाद 49 धावा(मिहिर जगताप 13(15), विशाल कुलकर्णी 10(6), प्रणव गुप्ता 2-5) पराभूत वि एसबीएच स्मॅशर्स- 5.1 षटकात 3 बाद 52 धावा (प्रथवीश शेट्टी 15(10), चिन्मय शहा 13(11), यश बोरा 2-12) सामनावीर- प्रणव गुप्ता
एसबीएच स्मॅशर्स संघाने 7 गडी राखून सामना जिंकला
सीए स्पार्टन्स- 8 षटकात 5 बाद 77 धावा(प्रतिक मनीयार नाबाद 25(17), लखन वेस्ट 15(9), प्रविण नलावडे 2-23) वि.वि सीए सुपरकिंग्ज- 8 षटकात 4 बाद 74 धावा (सचिन गोगवे 30(22), किरण गारगोटे 14(9), प्रविण नलावडे नाबाद 12(11), संदिप मुंदडा 1-11, लखन वेस्टt 1-17)सामनावीर-लखन वेस्ट
सीए स्पार्टन्स संघाने 3 धावांनी सामना जिंकला
सीए चॅम्प्स- 8 षटकात 6 बाद 79 धावा(आत्मन बागमार 19(15), अमोल कुलकर्णी 19(12), ऋषिकेश कौलवार 25(10), निपुण भंडारी 1-9)पराभूत वि रॉयल्स- 6.4 षटकात 2 बाद 80 धावा (कुणाल झामवार नाबाद 34(16), पवन मिरचंदानी नाबाद 19(13), निपुण भंडारी 16-7) सामनावीर- कुणाल झामनार
रॉयल्स संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.