शृष्टी सूर्यवंशी, शौर्य गदादे, काव्या पांडे , नीरज जोरवेकर यांना विजेतेपद
पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या तर्फे व केपीआयटी-आयकॉन यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील दुसऱ्या पीएमडीटीए आयकॉन कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2020 स्पर्धेत 8 वर्षाखलील मुलींच्या गटात शृष्टी सूर्यवंशी तर मुलांच्या गटात शौर्य गदादे यांनी तर 10 वर्षाखलील मुलींच्या गटात काव्या पांडे व नीरज जोरवेकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब, कोथरूड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखलील मुलींच्या गटात शृष्टी सूर्यवंशीने सारा फेंगसेचा 7-3 असा तर मुलांच्या गटात शौर्य गदादेने आर्यन बॉनर्जीचा 7-0 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. 10 वर्षाखलील मुलींच्या गटात काव्या पांडेने काव्या तुपेचा व मुलांच्या गटात नीरज जोरवेकरने आरव पटेलचा 7-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मेट्रोसीटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लबचे संचालक शिवाजी चौध, शितल ओस्वाल, दिलिप गायकवाड, सुधिर धावडे, बाळासाहेब कवाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे व स्पर्धा संचालक रेशम रणदीवे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 8वर्षाखालील मुले: अंतिम फेरी:
8 वर्षाखलील मुली
शृष्टी सूर्यवंशी वि.वि सारा फेंगसे 7-3
8 वर्षाखलील मुले
शौर्य गदादे वि.वि आर्यन बॉनर्जी 7-0
10 वर्षाखलील मुली
काव्या पांडे वि.वि काव्या तुपे 7-2
10 वर्षाखलील मुले
नीरज जोरवेकर वि.वि आरव पटेल 7-2