महिला बिलियर्ड्स (3-5 फेब्रुवारी); स्नूकर (5 – 9फेब्रुवारी).
मनिषा-व्हॅस्कॉन राष्ट्रीय बिलियर्ड्स व स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेस 1000हुन अधिक खेळाडूंचा सहभाग
पुणे:मनिषा-व्हॅस्कॉन राष्ट्रीय बिलियर्ड्स व स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुणे येथे 11जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधीत करण्यात आले असून तब्बल तीन वर्षांनंतर या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याचा मान पुण्याला मिळत आहे.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुमारे महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत माजी जगज्जेता पंकज अडवाणी आणि माजी आशियाई बिलियर्ड्स विजेता सौरव कोठारी या अव्वल भारतीय खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे आणि क्लबच्या बिलियर्ड्स विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांनी सांगितले की, या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून मनिषा कन्स्ट्रक्शन व व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. सब-ज्युनियर मुले व मुली, ज्युनियर मुले व मुली, तसेच वरिष्ठ पुरुष व महिला यांसह एकूण 12 गटांमधील राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपदासाठी झुंज देणार आहेत.पीवायसी हिंदू जिमखानाला ही स्पर्धा आयोजित करण्याचा मान चौथ्यांदा मिळत आहे. आम्ही याआधी 2009, 2012 आणि 2017 या वर्षी हि स्पर्धा आयोजित केली होती.
यावेळी बोलताना बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम)चे अध्यक्ष राजन खिंवसरा यांनी सांगितले की, मनिषा कन्स्ट्रक्शन गेल्या 10वर्षांपासून या स्पर्धेला प्रायोजित करत असून इतक्या दीर्घ काळापासून असा पाठिंबा लाभणे हि दुर्मिळ बाब आहे. एकूण 14 गटांमधील 1000हुन अधिक बिलियर्ड्स व स्नूकर पटू या स्पर्धेत सहभागी झाले असून इतक्या प्रचंड प्रमाणावर मिळणारा प्रतिसाद ही राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धेसाठी सकारात्मक बाब आहे. वरिष्ठ गटाच्या स्पर्धेबरोबरच कुमार गटाच्या स्पर्धा घेतल्यामुळे ज्युनियर व सब-ज्युनियर गटातील उदयोन्मुख खेळाडूंना देशांतील सर्वोत्तम खेळाडूंचे कौशल्य अगदी जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंकडून ते खेळाचे बारकावे शिकू शकतील आणि त्यांच्या खेळात वेगाने सुधारणा होईल, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेचा क्रम:
मुले: सब-ज्युनियर बिलियर्ड्स(11 -13 जानेवारी), सब-ज्युनियर स्नूकर(13 -16 जानेवारी);
ज्युनियर बिलियर्ड्स(पात्रता फेरी: 11-12 जानेवारी; मुख्य ड्रॉ: 13-16 जानेवारी)
ज्युनियर स्नूकर(पात्रता फेरी: 16-18 जानेवारी; मुख्य ड्रॉ: 19-23 जानेवारी)
वरिष्ठ बिलियर्डस(पात्रता फेरी: 21-22 जानेवारी; मुख्य ड्रॉ: 23-28 जानेवारी)
वरिष्ठ स्नूकर डबल एलिमनेशन(पात्रता फेरी: 27जानेवारी-2फेब्रुवारी; मुख्य ड्रॉ: 3-9 फेब्रुवारी)
मुली: सब-ज्युनियर बिलियर्ड्स (29-30 जानेवारी),
ज्युनियर बिलियर्ड्स अँड स्नूकर (31 जानेवारी-2 फेब्रुवारी);