16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019-20 स्पर्धेत यार्डी, दसॉल्ट सिस्टिम्स,सुनर्झीप,अॅटॉस् संघांचा विजय
पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019- 20 स्पर्धेत यार्डी, दसॉल्ट सिस्टिम्स,सुनर्झीप व अॅटॉस् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
व्हिजन क्रिकेट मैदान येथे झालेल्या सामन्यात साखळी फेरीत गौतम तुळपुळेच्या अचूक गोलंदीजीच्या बळावर यार्डी संघाने एफआयएस ग्लोबल संघाचा सर्व 10 गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना गौतम तुळपुळे व ऋषभ ताटीया यांच्या अचूक गोलंदाजीपुढे एफआयएस ग्लोबल संघ 20 षटकात 8 बाद 98 धावांत गारद झाला. 98 धावांचे लक्ष ऋषिकेश राऊतच्या जलद व नाबाद अर्धशतकासह यार्डी संघाने केवळ11.1 षटकात बिनबाद 99 धावा करून सहज पुर्ण करत विजय मिळवला. 14 धावात 4 गडी बाद करणारा गौतम तुळपुळे सामनावीर ठरला.दुस-या लढतीत सचिन पाटीलच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर दसॉल्ट सिस्टिम्स संघाने प्रिंगर नेचर संघाचा 9 गडी राखून दमदार पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
लेजेन्टस् क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या सामन्यात आकाश बिहाडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सुनर्झीप संघाने पबमॅटीक संघाचा 5 गडी राखून पराभव केला. दुस-या लढतीत संदिप भागवतच्या अष्टपैलु कामगिरीच्या बळावर अॅटॉस् संघाने आयडीयाज् संघाचा 2 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
एफआयएस ग्लोबल– 20 षटकात 8 बाद 98 धावा(गीत देसाई 23 (26), रोहन शिंदे 21 (18), आशिष रांजण 23 (17), ऋषभ ताटीया 2/15 , गौतम तुळपुळे 4/14) पराभूत वि यार्डी- 11.1 षटकात बिनबाद 99 धावा(ऋषिकेश राऊत नाबाद 51(39), स्वप्निलघीटगे नाबाद 32(29)) सामनावीर- गौतम तुळपुळे
यार्डी संघाने 10 गडी राखून सामना जिंकला.
प्रिंगर नेचर- 13 षटकात सर्वबाद 63 धावा(राजीव शेखर 23 (13), संदीप चौहाण 2/18, सचिन पाटील 2/17, पियुष इंगळे 2/02, अंशुल गोस्वामी 2/03) पराभूत वि दसॉल्ट सिस्टिम्स- 7.3 षटकात 1 बाद 64 धावा(अभिषेक जैसवाल नाबाद 35(27), अंशूल गोस्वामी नाबाद 21(13), जयप्रकाश शिरोळे 1/16) सामनावीर- सचिन पाटील
दसॉल्ट सिस्टिम्स संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.
पबमॅटीक- 20 षटकात 6 बाद 138 धावा(सुमित जुई 26 (28), तुषार शिरोडकर 21 (25), अमित जोशी 38 (32), शौलेश तुरीया 2/27, प्रसाद नागमणी 3/15) पराभूत वि सुनर्झीप- 19.5 षटकात 5 बाद 139 धावा(आकाश बिहाडे 52 (50), आकाश गांधी 30 (25), मुकेश सुधर्शन 3/13) सामनावीर- आकाश बिहाडे
सुनर्झीप संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.
अॅटॉस्- 20 षटकात 9 बाद 112 धावा(संदिप भागवत 38 (34), सौरभ मंजरमकर 27 (18), सुनिल कुंभार 2/19 , सुमित फोपटे 2/13 , हरिष अय्यर 2/14) वि.वि आयडीयाज्- 20 षटकात 9 बाद 110 धावा(भानु धिर 26 (20), नितेश छेत्री 21 (10), संदिप भागवत 2/13 , ओंकार तांदुळवाडकर 3/25) सामनावीर- संदिप भागवत
अॅटॉस् संघाने 2 धावांनी सामना जिंकला.