पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीवायसी अ, एमडब्लूटीए या संघांनी अनुक्रमे गोल्डन बॉईज व बालेवाडी टेनिस नट्स या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात पीवायसी अ संघाने गोल्डन बॉईज संघाचा 18-06 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सामन्यात 80अधिक गटात पीवायसीच्या अमित नाटेकर व सारंग देवी यांनी गोल्डन बॉईजच्या डॉ.अमित पाटणकर व चिराग रुणवाल यांचा 6-0 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात पीवायसीच्या योगेश पंतसचिव व अमित लाटे या जोडीने गोल्डन बॉईजच्या डॉ.केदार पाठक व आदित्य खटोड यांचा 6-2 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या खुल्या गटात पीवायसीच्या कौस्तुभ शहाने सारंग पाबळकरच्या साथीत कमलेश आठवले व जितेंद्र जोशी या जोडीचा 6-4 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एमडब्लूटीए संघाने बालेवाडी टेनिस नट्स संघाचा 18-11 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून निलेश ओसवाल, जयदीप वाकणकर, सुनील लुल्ला, प्रवीण पांचाळ, विवेक खडगे, अभिषेक सिंग यांनी अफलातून कामगिरी बजावली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
पीवायसी अ वि.वि.गोल्डन बॉईज 18-06(80अधिक गट: अमित नाटेकर/सारंग देवी वि.वि.डॉ.अमित पाटणकर/चिराग रुणवाल 6-0; खुला गट: योगेश पंतसचिव/अमित लाटे वि.वि.डॉ.केदार पाठक/आदित्य खटोड 6-2; खुला गट: सारंग पाबळकर/कौस्तुभ शहा वि.वि.कमलेश आठवले/जितेंद्र जोशी 6-4);
एमडब्लूटीए वि.वि.बालेवाडी टेनिस नट्स 18-11(80अधिक गट: निलेश ओसवाल/जयदीप वाकणकर वि.वि.दिपक पाटील/जॉय बॅनर्जी 6-4; खुला गट: सुनील लुल्ला/प्रवीण पांचाळ वि.वि.आलोक नायर/नितीन सावंत 6-4; खुला गट: विवेक खडगे/अभिषेक सिंग वि.वि.अमित किंडो/चेन्ना कुमार 6-3).