गट 2: रितिका मोरे वि.वि.मृणाल शेळके 6-3;
पीएमडीटीए मार्स्टस् टेनिस स्पर्धेत तेज ओक, शार्दूल खवळे, अर्णव बनसोडे, श्रावणी देशमुख यांचे विजय
पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित व केपीआयटी-आयकॉन ग्रुप प्रायोजित पीएमडीटीए मार्स्टस् टेनिस स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत मुलांच्या गटात तेज ओक, शार्दूल खवळे, अर्णव बनसोडे यांनी, तर मुलींच्या गटात श्रावणी देशमुख, रितिका मोरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत 12वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या सामन्यात तेज ओक याने शार्दूल खवळेचा 6-4 असा तर, दुसऱ्या सामन्यात तेजने आरुष मिश्राचा 6-0 असा सहज पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत अर्णव बनसोडेने अर्जुन कीर्तनेचा टायब्रेकमध्ये 6-5(4)असा पराभव केला.
मुलींच्या गटात श्रावणी देशमुख हिने अनुक्रमे निशिता देसाईचा 6-2 असा व अनन्या देशमुखचा 6-0 असा एकतर्फी पराभव करून शानदार सुरुवात केली. सहाना कमलाकननने दुर्गा बिराजदारवर टायब्रेकमध्ये 6-5(1)असा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: राउंड रॉबिन फेरी:
12वर्षाखालील मुले:
गट 1: तेज ओक वि.वि.शार्दूल खवळे 6-4;
गट 1: आरुष मिश्रा वि.वि.अर्जुन परदेशी 6-1;
गट 1: शार्दूल खवळे वि.वि.अर्जुन परदेशी 6-0;
गट 1: तेज ओक वि.वि.आरुष मिश्रा 6-0;
गट 2: अर्णव बनसोडे वि.वि. अर्जुन कीर्तने 6-5(4);
गट 2: नीव कोठारी वि.वि.अमन शहा 6-2;
गट 2:अर्णव बनसोडे वि.वि.अमन शहा 6-5(5);
12वर्षाखालील मुली:
गट 1: श्रावणी देशमुख वि.वि.निशिता देसाई 6-2;
गट 1: काव्या देशमुख वि.वि.अनन्या देशमुख 6-3;
गट 2: रितिका मोरे वि.वि.मृणाल शेळके 6-3;
गट 2: रितिका मोरे वि.वि.मृणाल शेळके 6-3;
गट 1: श्रावणी देशमुख वि.वि.अनन्या देशमुख 6-0;
गट 1: काव्या देशमुख वि.वि.निशिता देसाई 6-3;
गट 2: सहाना कमलाकनन वि.वि.दुर्गा बिराजदार 6-5(1).