पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीवायसी अ, बालेवाडी टेनिस नट्स या संघांनी अनुक्रमे लॉ कॉलेज लायन्स व पीसीएलटीए या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत अमित नाटेकर, सारंग देवी, सारंग पाबळकर, कौस्तुभ शहा यांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर पीवायसी अ संघाने लॉ कॉलेज लायन्स संघाचा 15-12 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
दुसऱ्या सामन्यात बालेवाडी टेनिस नट्स संघाने पीसीएलटीए संघाचा 14-11 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून जॉय बॅनर्जी, नितीन सावंत, चेन्ना कुमार, आलोक नायर यांनी सुरेख कामगिरी बजावली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
पीवायसी अ वि.वि.लॉ कॉलेज लायन्स 15-12(80अधिक गट: योगेश पंतसचिव/अमित लाटे पराभूत वि.संतोष जयभाई/राहुल पंढरपूरे 3-6; खुला गट: अमित नाटेकर/सारंग देवी वि.वि.केतन जाठर/मानस 6-1; खुला गट: कौस्तुभ शहा/सारंग पाबळकर वि.वि.तारख पारीख/शिवाजी यादव 6-5(6));
बालेवाडी टेनिस नट्स वि.वि.पीसीएलटीए 14-11(80अधिक गट: अमित किंडो/दिपक पाटील पराभूत वि.डॉ.राजू मित्तल/कुरियन थडकन 2-6; खुला गट: जॉय बॅनर्जी/नितीन सावंत वि.वि.गिरीश कुलकर्णी/कल्पेश मकणी 6-1;खुला गट: चेन्ना कुमार/आलोक नायर वि.वि.रवी जौकनी/निर्मल वाधवानी 6-4).