पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत गोल्डन बॉईज, एमडब्लूटीए या संघानी अनुक्रमे एमडब्लूटीए एसपी कॉलेज आणि महाराष्ट्र मंडळ या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत गोल्डन बॉईज संघाने एमडब्लूटीए एसपी कॉलेजचा 18-05 असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. गोल्डन बॉईज संघाकडून अमलेश आठवले, विजय गोखले, अमित पाटणकर, चिराग रुणवाल, केदार पाठक, आदित्य खटोड यांनी अफलातून कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात सुनील लुल्ला, राजेश मंकणी, जयदीप वाकणकर, निलेश ओस्तवाल, अभिषेक सिंग, प्रवीण पांचाळ यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एमडब्लूटीए संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा 18-09 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
गोल्डन बॉईज वि.वि.एमडब्लूटीए एसपी कॉलेज 18-05(80अधिक गट: अमलेश आठवले/विजय गोखले वि.वि.उमेश भिडे/मिलिंद घैसास 6-2; खुला गट: अमित पाटणकर/चिराग रुणवाल वि.वि.स्वेतल शहा/मंदार मेहेंदळे 6-1; खुला गट: केदार पाठक/आदित्य खटोड वि.वि.संतोष शहा/प्रणील बाडकर 6-1);
एमडब्लूटीए वि.वि.महाराष्ट्र मंडळ 18-09(80अधिक गट: सुनील लुल्ला/राजेश मंकणी वि.वि.संजय सेठी/कमलेश शहा 6-3; खुला गट: जयदीप वाकणकर/निलेश ओस्तवाल वि.वि.राजेंद्र देशमुख/अमित शर्मा 6-4; खुला गट: अभिषेक सिंग/प्रवीण पांचाळ वि.वि.अभिषेक चव्हाण/विक्रम श्रीश्रीमळ 6-2);
उप-उपांत्यपूर्व फेरी:
बालेवाडी टेनिस नट्स वि.वि.पीवायसी ब 18-08(80अधिक गट: रवी कोठारी/अमित किंडो वि.वि.केदार देशपांडे/सत्यमूर्ती 6-2; खुला गट: जॉय बॅनर्जी/नितीन सावंत वि.वि.राजू कांगो/डॉ.साठे 6-2; खुला गट: आलोक नायर/चेन्ना कुमार वि.वि.डॉ. जेमनीस/राहुल मुथा 6-4);
महाराष्ट्र मंडळ वि.वि.डेक्कन 14-06(80अधिक गट: संजय सेठी/अर्पित श्रॉफ पराभूत वि.सचिन आराध्ये/सुनंदन लेले 2-6; खुला गट: अभिषेक चव्हाण/विक्रम श्रीश्रीमळ वि.वि.अमोल बापट/आनंद कोटस्थाने 6-0; खुला गट: अमित शर्मा/राजेंद्र देशमुख वि.वि.डॉ.मनोज देशपांडे/इंद्रसेन घोरपडे 6-0).