पुणे: महाराष्ट्र क्रिडा यांच्या तर्फे आयोजित व इन्फोसिस रिक्रिएशन क्लब पुरस्कृत इन्फोसिस आंतर आयटी टी-20क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत टीसीएस संघाने इन्फोसिस संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
हिंजवडी फेज 2 येथील इन्फोसिस क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत मयंक जासोरेच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीसीएस संघाने इन्फोसिस संघाचा 1 धावेने पराभव करत विजेतेपद संपादन केले. अतितटीच्या झालेल्या लढतीत पहिल्यांदा खेळताना मयंक जासोरेच्या 43 व शंतनू नाडकर्णीच्या 21 धावांसह टीसीएस संघाने 20 षटकात 9 बाद 123 धावा केल्या. 123 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इन्फोसिस संघाने कडवी झुंज दिली मात्र यश मिळाले नाही. आशय पालकर 22 व संजय पुरोहितने 21 धावांसह इन्फोसिस संघाने 20 षटकात 9 बाद 122 धावा केल्या. टीसीएस संघाच्या सागर दुबे व मयंक जासोरे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. मयंक जासोरे सामनावीर ठरला.
स्पर्धेतील विजेत्या टीसीएस संघाला 50 हजार रूपये व करंडक तर उपविजेत्या इन्फोसिस संघाला 40 हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितेषीक वितरण इन्फोसिसचे डीसी हेड व एसएपीचे उपाध्यक्ष आणि डिलिव्हरी हेड प्रवीण कुलकर्णी आणि इन्फोसिसचे आयआरसी हेड आनंत बारटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावाळी महाराष्ट्र क्रिडाचे अश्विन पन्हाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी
टीसीएस- 20 षटकात 9 बाद 123 धावा(मयंक जासोरे 43 (34), शंतनू नाडकर्णी 21 (22), शारॉन थॉमसन 2/26 , रवी थापलीयाल 2/21 , आनंद कोंडा 2/30) वि.वि इन्फोसिस- 20 षटकात 9 बाद 122 धावा(आशय पालकर 22 (33), संजय पुरोहित 21 (27), सागर दुबे 3/27 , मयंक जासोरे 3/23) सामनावीर- मयंक जासोरे
टीसीएस संघाने 1 धावेने सामना जिंकला.
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट गोलंदाज- सागर दुबे(टीसीएस, 6 सामन्यात 13 गडी बाद)
सर्वोत्कृष्ट फलंदाज- सौरभ देवरे(सिमेन्स, 5 सामन्यात 196 धावा)
मालिकावीर- आशय पालकर(इन्फोसिस, 6 सामन्यात 165 धावा, 6 गडी बाद)