- आशय पालकर व आत्मन पोरे यांची भेदक गोलंदाजी
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत तिसऱ्या दिवशी आशय पालकर(104-5) व आत्मन पोरे(101-5) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने अनिर्णित सामन्यात पहिल्या डावात एमसीए संयुक्त जिल्हा संघाविरुद्ध 7 धावांची आघाडी मिळवत विजतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या अंतिम फेरीच्या तीन दिवसीय लढतीत तिसऱ्या एमसीए संयुक्त जिल्हा संघाच्या 53षटकात 7बाद 232धावापासून आज खेळ सुरु झाला. तत्पूर्वी डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावात 115.4षटकात सर्वबाद 379धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखानाच्या आशय पालकर(104-5), आत्मन पोरे(101-5)यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीपुढे एमसीए संयुक्त जिल्हा संघाचा डाव 89.5षटकात 372 धावावर संपुष्टात आला. यात शमशूझमा काझीने 210चेंडूत 26चौकार,3षटकारांच्या मदतीने 176धावांची तुफानी खेळी केली. काझीला आतिश वरपेने 42धावा, ओंकार यादवने 31धावा, निखिल कारलेने 55धावा ,मनोज इंगळेने नाबाद 27धावा करून सुरेख साथ दिली. शमशूझमा काझी व निखिल कारले(55धावा) यांनी सातव्या गड्यासाठी208चेंडूत 108धावांची भागीदारी संघाला आव्हानाच्या जवळ नेऊन ठेवले. पण हे दोघेही बाद मनोज इंगळेच्या नाबाद 27धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. एमसीए संयुक्त जिल्हा संघाचा डाव 372 धावावर संपुष्टात आल्यामुळे डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावात 7 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात डेक्कन जिमखाना संघाने आजदिवसअखेर 8.2 षटकात 1बाद 19धावा केल्या व त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. या अनिर्णित सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावाच्या आघाडीच्या फरकावर एमसीए संयुक्त जिल्हा संघाविरुद्ध विजय मिळवला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, रणजित पांडे आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
पहिला डाव: डेक्कन जिमखाना: 115.4षटकात सर्वबाद 379धावा(धीरज फतंगरे 133(195,14×4,7×6), आशय पालकर 112(239,16×4,1×6), यश बोरामणी 33,तुषार श्रीवास्तव 44(96,6×4), शुभांकर हार्डीकर 13, तरणजित सिंग डीलन 40-97-3, शमशुझमा काझी 25.4-113-5, मनोज इंगळे 17-64-1) वि. एमसीए संयुक्त जिल्हा संघ: 89.5षटकात सर्वबाद 372धावा(शमशूझमा काझी 176(210,26×4,3×6), आतिश वरपे 42(75,7×4), ओंकार यादव 31(48), निखिल कारले 55(119,9×4), ,मनोज इंगळे नाबाद 27, आशय पालकर 21.5-104-5, आत्मन पोरे 22-101-5); डेक्कन जिमखाना संघाकडे पहिल्या डावात 7धावांची आघाडी;
दुसरा डाव: डेक्कन जिमखाना: 8.2 षटकात 1बाद 19धावा(यश बोरामणी नाबाद 9, अभिषेक ताटे नाबाद 7, मनोज इंगळे 4-6-1); सामना अनिर्णित; डेक्कन जिमखाना पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी; सामनावीर-आशय पालकर.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: तुषार श्रीवास्तव;
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: सुजित उबाळे;
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: धीरज फतंगरे;
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: पंकज लालगुडे;
मालिकावीर: आशय पालकर.