पुणे, 13 डिसेंबर 2019: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 19व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेन्स, इमा राडकानू, रशियाच्या ओल्गा दोरोशिना, थायलंडच्या पेंगतार्न प्लिपूच यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेन्स हिने थायलंडच्या पुनिन कोवा पिटुक्टेडचा 6-1, 6-1 असा एकतर्फी पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. 1तास चाललेल्या लढतीत पहिल्या सेटमध्ये नैकताने सुरेख सुरुवात करत नेट जवळून आक्रमक खेळ केला. या सेटमध्ये पुनिनची नैकताने तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1 असा जिंकून आघाडी मिळवली. पिछाडीवर असलेल्या पुनिनला दुसऱ्या सेटमध्येदेखील नैकताने कमबॅक करण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यानंतर नैकताने आपली आक्रमक पवित्रा स्वीकारत चौथ्या व सहाव्या गेमला पुनिनची सर्व्हिस रोखली व 6-1 अशा सारख्याच फरकाने जिंकून विजय मिळवला. क्वालिफायर ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत बेलारूसच्या शालिमार तालबीचा 6-1, 5-7, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
थायलंडच्या आठव्या मानांकित पेंगतार्न प्लिपुच हिने ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसिया स्मिथचे आव्हान 6-4, 6-3 असे मोडीत काढले. रशियाच्या ओल्गा दोरोशिना हिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जपानच्या सातो नाहो 6-3, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्य फेरीतरशियाच्या दारिया मिशीना व ऍना मोरगिना या जोडीने चौथ्या मानांकित चीनच्या जिया-की कांग व थायलंडच्या पेंगतारण प्लिपूच यांचा 6-3, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत नॉर्वेच्या उलरीके एकेरी व रशियाच्या याशीना एकतेरिना यांनी कोरियाच्या किम दबीन व किम ना री यांचा 6-4, 2-6, 10-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ:उपांत्यपूर्व फेरी: एकेरी गट:
पेंगतार्न प्लिपुच(थायलंड)(8)वि.वि.ऍलिसिया स्मिथ(ऑस्ट्रेलिया)6-4, 6-3;
इमा राडकानू(ग्रेट ब्रिटन)वि.वि.शालिमार तालबी(बेलारूस)6-1, 5-7, 6-3;
नैकता बेन्स(ग्रेट ब्रिटन)(5)वि.वि.पुनिन कोवा पिटुक्टेड(थायलंड)6-1, 6-1;
ओल्गा दोरोशिना(रशिया)वि.वि.सातो नाहो(जपान) 6-3, 6-3;
दुहेरी गट: उपांत्य फेरी: