पात्रता फेरीत 14भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात
पुणे: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 19व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या चरणात 14 भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले असून जेनिफर लुईखाम या एकेमव भारतीय खेळाडूने पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत भारताच्या जेनिफर लुईखाम हिने अनिशा शेवतेचा 6-1, 6-3 असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. बोस्निया अँड हर्जेगोविनाच्या नेफिसा बेर्बोरोविच हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या सालसा आहेरचे आव्हान 7-5, 6-4 असे संपुष्टात आणले. 1तास 39मिनिटे चाललेल्या या लढतीत पहिल्या सेटमध्ये 10व्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात 5-5अशी निर्माण झाली. 11व्या गेममध्ये नेफिसाने सालसाची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. सामन्यात 4-4अशी बरोबरी असताना नवव्या गेममध्ये नेफिसाने सालसाची सर्व्हिस भेदली व 5-4 अशी आघाडी घेतली. त्यानंतर नेफिसाने आपले वर्चस्व कायम राखत बिनतोड सर्व्हिस केल्या व हा सेट 6-4असा जिंकून विजय मिळवला.
ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या आकांक्षा नित्तुरेचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. रशियाच्या ओल्गा दोरोशिनाने भारताच्या वैदेही चौधरीचा 6-1, 6-4 असा तर, थायलंडच्या पुनिन कोवा पिटुक्टेडने भारताच्या तेजस्वी काटेचा 6-1, 6-0 असा पराभव केला.
इटलीच्या कोरिना डेंटोनीने भारताच्या दिक्षा मंजू प्रसादचा 6-0, 6-0असा एकतर्फी पराभव केला. इस्राईलच्या वालदा कॅटीचने भारताच्या राम्या नटराजनचा टायब्रेकमध्ये 7-6(2), 6-2 असा पराभव करून दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाच्या अलिसिया स्मिथने भारताच्या रिचा चौगुलेला 6-0, 6-2 असे पराभूत केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:
याशीना एकतेरिना(रशिया)वि.वि.आरती मुनियन(भारत) 6-1, 6-3;
जिया-की कँग(चीन)वि.वि.अविका सागवाल(भारत) 6-2, 6-2;
इमा राडकानू(ग्रेट ब्रिटन)वि.वि.आकांक्षा नित्तुरे(भारत) 6-1, 6-0;
जेनिफर लुईखाम(भारत)वि.वि.अनिशा शेवते(भारत) 6-1, 6-3;
पुनिन कोवा पिटुक्टेड(थायलंड)वि.वि.तेजस्वी काटे(भारत) 6-1, 6-0;
नी मा झुओमा(चीन)वि.वि.व्हिकटोरिया मुंतीन(फ्रांस) 6-4, 7-5;
कोरिना डेंटोनी(इटली)वि.वि.दिक्षा मंजू प्रसाद(भारत) 6-0, 6-0;
अलिसिया स्मिथ(ऑस्ट्रेलिया)वि.वि.रिचा चौगुले(भारत) 6-0, 6-2;
मनंचया सवायिंख(थायलंड)वि.वि.हुमेरा शेख(भारत) 6-0, 6-1;
सातो नाहो(जपान)वि.वि.परीन शिवेकर(भारत) 6-3, 6-2;
ओल्गा दोरोशिना(रशिया)वि.वि.वैदेही चौधरी(भारत) 6-1, 6-4;
नेफिसा बेर्बोरोविच(बोस्निया अँड हर्जेगोविना)वि.वि.सालसा आहेर(भारत)7-5, 6-4;
वालदा कॅटीच(इस्राईल)वि.वि.राम्या नटराजन(भारत) 7-6(2), 6-2;
स्टेफी कॅररुथर्स(सामोआ)वि.वि.पूजा इंगळे(भारत) 6-4, 6-1;
एव्हेग्निया बर्डीन(रशिया)वि.वि.सौम्या वीज(भारत) 6-3, 6-2;
फ्रेया ख्रिस्ती(ग्रेट ब्रिटन)वि.वि.अभिलाषा मेहरा(भारत)6-1, 6-0.