पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019- 20 स्पर्धेत सनगार्ड एएस, कॅपजेमिनी, दसॉल्ट सिस्टिम्स व सायबेज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
व्हिजन क्रिकेट मैदान येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अभिजीत देशपांडेच्या 44 धावांच्या बळावर सनगार्ड एएस संघाने प्रिंगर नेचरचा 5 धावांनी पराभव करून स्पर्धेत आगेकुच केली. मयुर खिरिदच्या अष्टपैलू कामगिराच्या जोरावर दसॉल्ट सिस्टिम्स संघाने आयबीएम संघाचा 5 गडी राखून पराभव केला.
अन्य लढतीत प्रतिक दुबेच्या 49 धावांच्या जोरावर कॅपजेमिनी संघाने विप्रो संघाचा 38 धावांनी तर विक्रम पोटेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर सायबेज संघाने एफआयएस ग्लोबल संघाचा 51 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
प्रिंगर नेचर- 19 षटकात सर्वबाद 100 धावा(राजीव शेखर 40 (28), वैभव घनवट 23 (23), कौस्तुभ बकरे 3/12, अश्विन गोरेल 2/22, उध्दव गायकवाड 2/09) पराभूत वि सनगार्ड एएस-15 षटकात 5 बाद 101 धावा(अभिजीत देशपांडे 44 (30), राहुल सदाशिवन नाबाद 25 (27), राजीव शेखर 3/15) सामनावीर- अभिजीत देशपांडे
सनगार्ड एएस संघाने 5 धावांनी सामना जिंकला.
आयबीएम- 20 षटकात 9 बाद 166 धावा(प्रतिक कुलकर्णी 32 (17), प्रविण दाते 40 (32), धरमवीर सिंग 21 (22), विजय कमाने 22 (9), मयुर खिरिद 2/32, ओंकार गाढवे 2/25) पराभूत वि दसॉल्ट सिस्टिम्स- 17.5 षटकात 5 बाद 167 धावा(श्रीधर खासनीस 39 (27), मंदार जोशी 42 (30), मयुर खिरीद 41 (26), प्रतिक कुलकर्णी 2/28) सामनावीर- मयुर खिरिद
दसॉल्ट सिस्टिम्स संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.
कॅपजेमिनी- 20 षटकात 7 बाद 163 धावा(प्रतिक दुबे 49 (41), संदिप यादव 39 (23), अंश झा नाबाद 21(8), सौरभ बिश्त 3/32) वि.वि विप्रो-17 षटकात सर्वबाद 125 धावा(रवीकिरण बायद 29 (32), सनी भारव्दाज 47 (19), फनिंद्र पायला 2/23 , गुरप्रीत सिंग 3/23) सामनावीर-प्रतिक दुबे
कॅपजेमिनी संघाने 38 धावांनी सामना जिंकला.
सायबेज- 20 षटकात 6 बाद 152 धावा(सौरभ रावळ 22 (17), अविनाश माळी 29 (32), संकेत एकल नाबाद 43 (38), मोहम्मद काशीफ 33 (19), सुरेश दुबल 2/26) वि.वि एफआयएस ग्लोबल- 14.5 षटकात सर्वबाद 101 धावा(सुरज दुबल 21 (13), प्रशांत पोळ 49 (31), विक्रम पोटे 4/24, राकेश शिंदे 3/08, मोहम्मद अंसारी 2/21) सामनावीर- विक्रम पोटे
सायबेज संघाने 51 धावांनी सामना जिंकला.