पुणे: पीएमपी ग्रुप पुणे यांच्या वतीने आयोजित एचकेसी 14 वर्षाखालील करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत एजीपी ग्रुप संघाने पुना वॉरीयर्स संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
पुना क्लब क्रिकेट मैदनानावर झालेल्या सामन्यात साखळी फेरीत यश महानवरच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर एजीपी ग्रुप संघाने पुना वॉरीयर्स संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना यश महानवर व यश बोरकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे पुना वॉरीयर्स संघ केवळ 27.4 षटकात सर्वबाद 83 धावांत गारद झाला. यश महानवरने केवळ 24 धावा देत 5 गडी बाद केले. 83 धावांचे लक्ष धैर्य मानेच्या 34 व अक्रम सय्यदच्या नाबाद 13 धावांसह एजीपी ग्रुप संघाने केवळ 14.5 षटकात 2 बाद 86 धावा करून सहज पुर्ण करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
दुस-या लढतीत अभिग्यान कुंडूच्या दमदार अष्टपैलु खेळाच्या जोरावर अविनाश साळवी फाउंडेशन संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 8 गडी राखून पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पुना वॉरीयर्स- 27.4 षटकात सर्वबाद 83 धावा(अथर्व एकबोटे नाबाद 17, आशिष गुजारे 17, अभिषेक कुलकर्णी 18, यश महानवर 5-24, यश बोरकर 2-24) पराभूत वि एजीपी ग्रुप- 14.5 षटकात 2 बाद 86 धावा(धैर्य माने 34, अक्रम सय्यद नाबाद 13, प्रणव देव 1-8) सामनावीर- यश महानवर
एजीपी ग्रुप संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.
क्लब ऑफ महाराष्ट्र- 49.3 षटकात सर्वबाद 158 धावा(राज मसल 44, कुणाल अंबेदरे 23, रिध्देश भुरूक 20, अभिग्यान कुंडू 4-27, अदित्य खडका 3-23) पराभूत वि अविनाश साळवी फाउंडेशन- 43.2 षटकात 2 बाद 160 धावा(अभिग्यान कुंडू नाबाद102(142), तेजस गव्हाणे 1-30) सामनावीर- अभिग्यान कुंडू
अविनाश साळवी फाउंडेशन संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.