- संयुक्त जिल्हा संघाच्या रिषभ बन्सल(5-35)भेदक गोलंदाजी
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत रिषभ बन्सल(5-35) याने केलेल्या भेदक गोलंदाजीसह सनतकुमार मालगे नाबाद(35धावा), सौरभ गढक(37धावा) यांनी केलेल्या छोट्या पण महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर संयुक्त जिल्हा संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 5 गडी राखून पराभव केला.
नेहरू स्टेडीयम क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या दोन दिवसीय लढतीत काल संयुक्त जिल्हा संघाने 38.2षटकात 106धावा करून पहिल्या डावात 25 धावांची आघाडी घेतली. तत्पूर्वी क्लब ऑफ महाराष्ट्र संघ प्रथम फलंदाजी करताना 34षटकात 81धावावर संपुष्टात आला.
दुसऱ्या डावात रिषभ बन्सल(35-5)याने केलेल्या भेदक माऱ्यापुढे क्लब ऑफ महाराष्ट्र संघ 43.2षटकात 138 धावावर आटोपला. यात राजवर्धन उंडरे 68, शिवकुमार चुग 25, विराज दारवाटकर 24 यांनी धावा करून संघाला 114धावांचे आव्हान संयुक्त जिल्हा संघापुढे ठेवले. हे आव्हान संयुक्त जिल्हा संघाने 41.2षटकात 5बाद 114धावा करून पूर्ण केले. यात सनतकुमार मालगे नाबाद 35धावा सौरभ गढक 37धावा, आनंद जगताप 15धावा, उबेद खान 10 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी रिषभ बन्सल ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 34षटकात सर्वबाद 81धावा(शिवकुमार चुग 26(35), अथर्व जोशी 22(44), विशाल पारीक नाबाद 14, रिषभ बन्सल 3-19, गिरीश बोचरे 2-2, अनिकेत इंद्रजीत 1-2, ओंकार पाटकल 1-21, आनंद जगताप 1-15) वि.संयुक्त जिल्हा संघ: 38.2षटकात सर्वबाद 106धावा(रिषभ बन्सल 32(45), रोहन थोरात 23(46), शिवराम चुग 3-28, अथर्व जोशी 3-20, राजवर्धन उंडरे 2-21); संयुक्त संघाकडे 25धावांची आघाडी;
दुसरा डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 43.2षटकात सर्वबाद 138 धावा(राजवर्धन उंडरे 68(132,10×4), शिवकुमार चुग 25(45), विराज दारवाटकर 24(34), रिषभ बन्सल 12-35-5, गिरीश बोचरे 5.2-16-3, अनिकेत इंद्रजीत 6-16-2)पराभूत वि.संयुक्त जिल्हा संघ: 41.2षटकात 5बाद 114धावा(सनतकुमार मालगे नाबाद 35(87), सौरभ गढक 37(56), आनंद जगताप 15, उबेद खान 10, शुभम मेड 14-34-4, राजवर्धन उंडरे 13-15-1);सामनावीर-रिषभ बन्सल.