पुणे, 14नोव्हेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी-पुसाळकर सु-रक-क्षा कंपोनंट्स पीवायसी प्रीमियर लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत टस्कर्स, स्कॅवेंजर्स या संघांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात हर्षल गंद्रेच्या 28धावांच्या जोरावर टस्कर्स संघाने लायन्स संघाचा 22 धावांनी पराभव करून सलग चौथ्या विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात सुमेध शहा(30धावा व 1-5) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्कॅवेंजर्स संघाने हॉग्स संघाचा 19धावांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
दुसऱ्या सामन्यात सुमेध शहा(54धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर स्कॅवेंजर्स संघाने वूल्वसचा 33धावांनी पराभव करून विजय नोंदविला. प्रथम फलंदाजी करताना स्कॅवेंजर्स संघाने 6षटकात 3बाद 76धावा केल्या. यात सुमेध शहाने 22चेंडूत 1चौकार व 5षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना वूल्वसला निर्धारित षटकात 6षटकात 7बाद 43धावाच करता आल्या. यात अन्विर नानाने 13धावा करून थोडासा प्रतिकार केला. स्कॅवेंजर्सकडून नचिकेत जोशी(2-4), तन्मय चोभे(2-5), दर्शन कांकरिया(1-16)यांनी अफलातून गोलंदाजी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
अन्य लढतीत जयदीप गोडबोलेच्या नाबाद 42धावांच्या जोरावर विअरवूल्वस संघाने बुल्सचा 16धावांनी पराभव केला. रोहन छाजेडच्या 33धावांच्या जोरावर डॉल्फिन्स संघाने पँथर्स संघाचा 8गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
टस्कर्स: 6षटकात 2बाद 84धावा(श्रीनिवास चाफळकर 24(13,1×4,2×6), हर्षल गंद्रे 28(12, 2×4,2×6), अंजनेया साठे नाबाद 21(10,3×4, 1×6), निल हळबे 1-16)वि.वि.लायन्स: 6षटकात 2बाद 62धावा(गौरव कासट नाबाद 35(17,5×4,1×6), ओजस साबडे 23(15), ईशान भाले 1-6);सामनावीर-हर्षल गंद्रे;
स्कॅवेंजर्स: 6षटकात 4बाद 74धावा(सुमेध शहा 30(13), नचिकेत जोशी 14, हर्षा जैन 1-6, अभिजित तावरे 1-6)वि.वि.हॉग्स: 6षटकात 3बाद 55धावा(हर्षा जैन नाबाद 42(20,1×4,4×6), सुमेध शहा 1-5, मिलिंद शालगर 1-5);सामनावीर-सुमेध शहा;
विअरवूल्वस: 6षटकात 3बाद 82धावा(जयदीप गोडबोले नाबाद 42(15, 4×4,3×6),कृष्णा मेहता 18, राहुल कुंकुलोल 15, सुमेध गांगल 1-9, देवेंद्र चितळे 1-18)वि.वि.बुल्स: 6षटकात 3बाद 66धावा(सुमेध गांगल 25(13), उदय जाधव नाबाद 21, देवेंद्र चितळे 14, अभिजित भाटे 2-5);सामनावीर-जयदीप गोडबोले;
स्कॅवेंजर्स: 6षटकात 3बाद 76धावा(सुमेध शहा 54(22,1×4,5×6), तन्मय चोभे 10(11), शिरीष साठे 2-13) वि.वि.वूल्वस: 6षटकात 7बाद 43धावा(अन्विर नाना 13, नचिकेत जोशी 2-4, तन्मय चोभे 2-5, दर्शन कांकरिया 1-16);सामनावीर-सुमेध शहा;
पँथर्स: 6षटकात 6बाद 57धावा(कर्णा मेहता 28(17), अनुज मेहता 17, क्रिश शहा 1-4, अभिजित मुनोत 1-8)पराभूत वि.डॉल्फिन्स: 5षटकात 2बाद 60धावा(रोहन छाजेड 33(16, 1×4,3×6), सुधांशू मेडसीकर 21(12,2×4,1×6), अनुज मेहता 2-11);सामनावीर-रोहन छाजेड;
लायन्स: 6षटकात 3बाद 55धावा(गौरव कासट नाबाद 28(17), विमल हंसराज 17, नकुल पटेल 1-6, चारुदत्त दातार 1-4, चिन्मय जोशी 1-10)पराभूत वि.चिताज: 5षटकात बिनबाद 56धावा(चारुदत्त दातार नाबाद 23(16,2×4));सामनावीर- नकुल पटेल.