पुणे: जगांतील व आशियातील अव्वल टेनिस प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या स्टीफन कुन यांनी एपीएमटीए(आदर पूनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमी)साठी पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे 17 ते 25 सप्टेंबर या कालावधीत टेनिस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाटेनिस फाऊंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे खास आयोजन करण्यात आले आहे.
स्टीफन कुन हे मूळ थायलंडमधील बँकॉक येथील प्रशिक्षक असून त्यांनी याआधी भारताचा युवा टेनिसपटू युकी भांब्री(2016-2018दरम्यान) मार्गदर्शन केले आहे. तसेच केविन अँडरसन, हिओन चूँग, निकोलोझ बॅसिलाश्विली, योशितो निशिओका, लु येन सून, लॉईड हॅरिस, तारो डॅनियल, या एटीपी खेळाडूंना डब्लूटीए खेळाडू प्रांजला येडलापल्ली यांनादेखील मार्गदर्शन केले आहे. एपीएमटीए आणि स्टीफन कुन आगामी वर्षभरात अनेक कार्यक्रम राबविणार आहेत.
महाटेनिस फाऊंडेशनच्या या उपक्रमाचा एक भाग असलेल्या एपीएमटीए अकादमीच्या प्रशिक्षण विभागाचे संचालक आदित्य मडकेकर याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले कि, स्टीफन कुन हे आशियातील सर्वोत्तम टेनिस प्रशिकसांपैकी एक असून ते सध्याअव्वल क्रमवारीत असलेल्या एटीपी आणि डब्लूटीए खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. अशा दर्जेदार प्रशिक्षकांनी पुण्यात शिबीर आयोजित करून खेळाडूंना मार्गदर्शन केल्यामुळे आमच्या खेळाडूंना टेनिसमधील कौशल्याबरोबरच तंदरुस्ती मानसिक सामर्थ्य आणि खेळातील बारकावे शिकण्याची संधी मिळणार असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये याचा मोठाच उपयोग होणार आहे.