आरडब्लूआयटीसी क्लबवर द एफ.डी.वाडिया ट्रॉफी आणि द पंचशील मिलियनचे आयोजन
पुणे, 23 ऑगस्ट 2019 : येत्या शनिवारी, 24 ऑगस्ट व रविवार 25 ऑगस्ट रोजी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी) यांच्या तर्फे अश्वशर्यतींच्या यंदाच्या मौसमातील दोन अत्यंत रोमांचकारी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून द एफ.डी.वाडिया ट्रॉफी आणि द पंचशील मिलियन या दर्जेदार शर्यतींमध्ये एकाहून एक सरस अश्वामधील चुरस अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
यातील शनिवारी होणार्या पहिल्या रंगतदार शर्यतीत द एफ.डी.वाडिया ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या अश्वांमधील झुंज पाहता येणार आहे. ही शर्यत शनिवारी, 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार असून ही प्रतिष्ठेची शर्यत सर्वप्रथम द पूना सिटी कप या नावाने ओळखली जात होती आणि त्यानंतर या रेसला 1976 रोजी फली वाडिया यांनी घोड्यांच्या शर्यतीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल या रेसला द एफ.डी.वाडिया ट्रॉफी असे नाव देण्यात आले. या शर्यतीत अत्यंत उच्च कामगिरीचा इतिहास असणार्या 3 वर्षे वयाच्या अश्वाचा सहभाग असून 1400 मीटर अंतराची ही रेस असणार आहे.
रविवारी होणार्या द पंचशील मिलियन या दुसर्या शर्यतीतही दर्जेदार अश्व आणि उत्तम जॉकी यात झुंज रंगणार आहे. पंचशील रिअलिटी यांचे प्रायोजकत्व लाभलेली ही शर्यत रविवार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे. 1200 मीटर अंतराची ही रेस असणार आहे.