अमनोरा मॉल येथे स्क्वॅश ग्लास कोर्ट; हा मान मिळविणारे देशातील दुसरे
पुणे- महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस् फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखालीहोत असलेल्या 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत 25राज्यांतील एकूण 474 खेळाडूंमध्ये जोश्ना चिनप्पा, महेश माणगावकरयांसारखे अव्वल मानांकित भारतीय खेळाडू झुंजणार आहेत. ही स्पर्धा दि.10 ते 16 जून 2019 या कालावधीत आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस् क्लब, मुंढवा, आरएसआय आणि अमनोरा मॉल ग्लास स्क्वॅश कोर्टवर होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए)चे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे आणि सचिव डॉ. ए. दयानंद कुमार यांनी सांगितलेकी, राजस्थान, चेन्नई, चंदीगढ, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्र अशा 25राज्यांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये 115महाराष्ट्रातील खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेला पंचशील आणि जहांगीर हॉस्पिटल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
तसेच, या स्पर्धेला एसआरएफआय 7 स्टारची मान्यता मिळाली असून ही स्पर्धा स्क्वॅश रॅकेटस् फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होतआहे. स्पर्धेत एकुण 12लाख रूपयांची पारितोषिके देण्यात असून विजेत्या खेळाडूंना मानांकन गुण मिळणार आहेत.
यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष व पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट म्हणाले की, इतक्या उच्च दर्जाची स्पर्धा आयोजित करण्याचा मान पुणेशहराला अभिमान व आनंद वाटत आहे. स्क्वॅश या खेळामुळे पुणे शहर हे नेहमीच आघाडीवर राहिले आहे या स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यातआल्यामुळे शहरातील आणि राज्यातील गुणवान स्क्वॅशपटुंना प्रोत्साहन देण्याबरोबरच पुणे शहरातील स्क्वॅश विश्वाला पुन्हा एकदा राष्ट्रीयस्तरावर स्थान मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए)चे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे म्हणाले की, ही स्पर्धा एकुण 9 वयोगटात होणार असून यामध्ये पुरुष व महिलागट, 35वर्षावरील, 40वर्षावरील, 45वर्षावरील, 50वर्षावरील, 55वर्षावरील, 60वर्षावरील, 65वर्षावरील पुरुष गट आणि प्रोफेशनल गट यांचा समावेश आहे.यातील पुरुष व महिला गटातील सामने अमनोरा मॉल येथे उभारण्यात आलेल्या ग्लास कोर्टवर होणार असून इतर गटातील सामने आयस्क्वॅश अकादमीयेथे होणार आहेत. अमनोरा मॉल येथे नव्याने उभारण्यात हे खास स्क्वॅश ग्लास कोर्टमुळे पुण्याला देशातील अशा प्रकारचे स्क्वॅश ग्लास कोर्ट असलेलेकेवळ दुसरे बनण्याचा मान मिळाला आहे. स्पर्धेत महेश मानगावकर, उर्वशी जोशी, जोश्ना चिनप्पा यासांरखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, आशियाई पदकविजेते खेळाडू व राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा अधिकच चुरशीची होणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
स्पर्धेत अमितपाल कोहली(35वर्षावरील),सौरभ नायर(40वर्षावरील), दिलीप त्रिपाठी(45वर्षावरील), आशिष कामत(50वर्षावरील), आशूनबेहल(55वर्षावरील), ललित कुमार अग्निहोत्री(60वर्षावरील), राजीव रेड्डी(65वर्षावरील) हे अव्वल मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणारआहेत, तसेच याशिवाय या वरिष्ठ खेळाडूंसह अर्णव सरीन, अनिका दुबे, रौनक सिंग आणि तीर्थ झिल्का हे मानांकित कुमार झुंजणार असल्याचेएमएसआरएचे सचिव डॉ. ए. दयानंद कुमार सांगितले.