पुणे, दि.30 मे 2019: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने केडन्स संघाचा 81 धावांनी तर, दुसऱ्या सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 114 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर चुरशीच्या झालेल्या या उपांत्य फेरीच्या लढतीत काल पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 37.3षटकात 184धावा केल्या. केडन्स संघाचा आज 23षटकांपासून खेळ सुरु झाला. यात हर्षद खडीवाले 64, गणेश गायकवाड 51, अथर्व काळे 26, अक्षय वाईकर 22, जय पांडे 18, अथर्व धर्माधिकारी 20 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर केडन्सने 40 षटकात 9 बाद 261 धावा केल्या. पण त्यांचे 9 गडी बाद झाल्याने केडन्सची अंतिम धावसंख्या 216(वजा 45धावा)झाली व केडन्सने पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली. पीवायसीकडून यश मानेने अफलातून गोलंदाजी करत 70 धावात 5 गडी बाद केले. दुसऱ्या डावात पीवायसी संघाने 20 षटकात 8 बाद 186धावा केल्या. पीवायसीचे 8 गडी बाद झाल्याने त्यांची अंतिम धावसंख्या 146धावा(वजा 40धावा)झाली. यात दिव्यांग हिंगणेकरने 49 चेंडूत 42 धावा व मंदार भंडारीने 18 चेंडूत 32 धावा केल्या. दिव्यांग व मंदार यांनी दुसऱ्या गडयासाठी 76 चेंडूत 92 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर प्रीतम पाटील 39, योगेश चव्हाण 17, आदित्य लोंढे 17 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. केडन्सकडून इझान सय्यद(28-4), सिद्देश वरघंटी(43-2), अक्षय वाईकर(37-1)यांनी सुरेख गोलंदाजी केली. केडन्सला विजयासाठी निर्धारित षटकात 115 धावांचे आव्हान होते. 115 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केडन्सला पीवायसी संघाच्या भेदक माऱ्यापुढे त्यांची खेळी निष्प्रभ ठरली. त्यांचा डाव 17.2षटकात 83 धावांवर संपुष्टात आला. केडन्सचे 10 गडी बाद झाल्याने त्यांची धावसंख्या 33(वजा 50धावा) झाली. यात अथर्व काळे 19, हर्षद खडीवाले 18, जय पांडे 13 यांनी थोडासा प्रतिकार केला. पीवायसीकडून योगेश चव्हाण(15-3), अमेय भावे(6-2), रोहन दामले(12-2), दिव्यांग हिंगणेकर(13-1), साहिल छुरी(28-1)यांनी भेदक गोलंदाजी करत संघाला 81 धावांनी एकहाती विजय मिळवून दिला.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 40षटकात 9बाद 213धावा केल्या. तत्पूर्वी काल डेक्कन जिमखाना संघ 22.5 षटकात 5 बाद 124 अशा स्थितीत होता. यात अभिषेक ताटे 41, स्वप्निल फुलपगारे 34 यांनी धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर शुभम नागवडेच्या 36धावा, शुभांकर हार्डीकरच्या 34 धावा वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. व्हेरॉककडून विशाल गीते(34-3), शुभम तैस्वाल(42-3), राहुल वारे(28-1), अॅलन रॉड्रिगेस(44-2)यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत डेक्कन संघाला 222 धावांवर रोखले. पण त्यांचे 9 गडी बाद झाल्याने अंतिम धावसंख्या 177(वजा 45)झाली. त्यामुळे व्हेरॉक संघाने पहिल्या डावात 36 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने 20षटकात 3बाद 187 धावा केल्या. व्हेरॉकचे 3 गडी बाद झाल्याने अंतिम धावसंख्या 172धावा(वजा15)झाली. यामध्ये ऋतुराज गायकवाडने तुफानी खेळी करत 46 चेंडूत 8 चौकार व 2षटकारांसह नाबाद 74 धावांची खेळी केली. ऋतुराजला ओम भोसलेने 71 चेंडूत 68धावा, तर विनय पाटीलने 29 धावा काढून सुरेख साथ दिली. डेक्कन जिमखाना संघाला 20 षटकात विजयासाठी 209 धावांचे आव्हान होते. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाला 20षटकात 9बाद 129 धावांच करता आल्या. 9 गडी बाद झाल्याने डेक्कनची धावसंख्या 94धावा(वजा 35धावा)झाली. यात स्वप्निल फुलपगारे 30, शुभम नागवडे 28 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. व्हेरॉककडून राहुल वारे(27-2), शुभम तैस्वाल(18-2), अॅलन रॉड्रिगेस(23-2) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.
स्पर्धेचा अंतिम सामना पीवायसी हिंदु जिमखाना व व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी यांच्यात शनिवार 1 जून व रविवार 2 जून रोजी पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान:
पहिला डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 37.3षटकात सर्वबाद 184धावा(234-50धावा)(रोहन दामले 65(81,5×4,3×6), मंदार भंडारी 54(52,9×4,1×6), प्रीतम पाटील 22(13), योगेश चव्हाण 18(16), दिव्यांग हिंगणेकर 16(26), अमेय भावे 13, अक्षय वाईकर 7.3-47-4, प्रसन्ना हजारे 6-34-3, गणेश गायकवाड 7-51-2, हर्षद खडीवाले 3-27-1) वि.केडन्स: 40षटकात 9बाद 216धावा(261-45धावा)(हर्षद खडीवाले 64(78), गणेश गायकवाड 51(69), अथर्व काळे 26(26), अक्षय वाईकर 22(11), जय पांडे 18(31), अथर्व धर्माधिकारी 20(24), यश माने 8-70-5, प्रीतम पाटील 6-54-2, योगेश चव्हाण 2-22-1); पहिल्या डावात केडन्स संघाकडे 32 धावांची आघाडी;
दुसरा डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 20षटकात 8बाद 146धावा(186-40धावा) (दिव्यांग हिंगणेकर 42(49,1×4,1×6), मंदार भंडारी 32(18,5×4,1×6), प्रीतम पाटील 39(35), योगेश चव्हाण 17, आदित्य लोंढे 17, इझान सय्यद 4-28-4, सिद्देश वरघंटी 4-43-2, अक्षय वाईकर 4-37-1, हर्षद खडीवाले 4-33-1) वि.वि.केडन्स: 17.2षटकात सर्वबाद 33धावा(83-50धावा)(अथर्व काळे 19, हर्षद खडीवाले 18, जय पांडे 13, योगेश चव्हाण 4-15-3, अमेय भावे 1-6-2, रोहन दामले 3.2-12-2, दिव्यांग हिंगणेकर 3-13-1, साहिल छुरी 4-28-1); सामनावीर-रोहन दामले;पीवायसी 81 धावांनी विजयी;
डेक्कन जिमखाना मैदान:
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 40षटकात 9बाद 213धावा (258-45धावा) (ऋतुराज गायकवाड 100(95, 9×4), ओम भोसले 77(76,10×4), उत्कर्ष अगरवाल 29(45), आशय पालकर 8-49-4, श्लोक धर्माधिकारी 4-44-1, मुकेश चौधरी 8-39-1, यश बांबोळी 5-27-1) वि.डेक्कन जिमखाना: 40षटकात 9गडी बाद 177धावा(222-45धावा)(अभिषेक ताटे 41(67,3×4), स्वप्निल फुलपगारे 34(43,3×4), शुभम नागवडे 36(35), शुभांकर हार्डीकर 34(60), विशाल गीते 7-34-3, राहुल वारे 7-28-1, अॅलन रॉड्रिगेस 8-44-2, शुभम तैस्वाल 8-42-3); व्हेरॉक संघाकडे 36धावांची आघाडी;
दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 20षटकात 3बाद 172धावा(187-15धावा)(ऋतुराज गायकवाड नाबाद 74(46,8×4,2×6), ओम भोसले 68(71,5×4), विनय पाटील 29(39), यश बंबोली 4-39-2) वि.वि.डेक्कन जिमखाना: 20षटकात 9बाद 94धावा(129-35धावा)(स्वप्निल फुलपगारे 30(20), शुभम नागवडे 28(17), राहुल वारे 4-27-2, शुभम तैस्वाल 4-18-2, अॅलन रॉड्रिगेस 4-23-2, विशाल गीते 2-17-1); सामनावीर-ऋतुराज गायकवाड; व्हेरॉक संघ 114 धावांनी विजयी.