आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ व ब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात पीवायसी अ आणि पीवायसी ब या संघांनी अनुक्रमे पीवायसी क व सोलारिस 2 या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पीवायसी अ संघाने पीवायसी क संघाचा 24-07 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सामन्यात 100अधिक गटात पीवायसी अ संघाच्या अभिषेक ताम्हाणे व सत्यमूर्ती यांनी पीवायसी क संघाच्या हर्षा हळबे व डॉ. साठे यांचा 6-1 असा तर, खुल्या गटात पीवायसी अ संघाच्या केतन धुमाळ व ऋतू कुलकर्णी यांनी ध्रुव मेड व सारंग देवी यांचा 6-2 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. 90अधिक गटात पीवायसी अ संघाच्या जयंत कढे व प्रशांत सुतार या जोडीने पीवायसी क संघाच्या हनीफ मेमन व अमित नाटेकर य जोडीचा 6-0 असा तर, खुल्या गटात केदार शहाने डॉ.अभय जमेनीसच्या साथीत पीवायसी क संघाच्या कौस्तुभ शहा व मिहीर दिवेकर यांचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात हिमांशू गोसावी, अनुप मिंडा, सारंग पाबळकर, अमोघ बेहेरे, योगेश पंतसचिव, सुंदर अय्यर, वरुण मागिकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी ब संघाने सोलारिस 2 संघाचा 24-02 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: इलाईट डिव्हिजन:
पीवायसी अ वि.वि.पीवायसी क 24-07(100अधिक गट: अभिषेक ताम्हाणे/सत्यमूर्ती वि.वि.हर्षा हळबे/डॉ. साठे 6-1; खुला गट: केतन धुमाळ/ऋतू कुलकर्णी वि.वि.ध्रुव मेड/सारंग देवी 6-2; 90अधिक गट: जयंत कढे/प्रशांत सुतार वि.वि.हनीफ मेमन/अमित नाटेकर 6-0; खुला गट: केदार शहा/डॉ.जमेनीस वि.वि.कौस्तुभ शहा/मिहीर दिवेकर 6-4);
पीवायसी ब वि.वि.सोलारिस 2 24-02(100अधिक गट: हिमांशू गोसावी/अनुप मिंडा वि.वि.मनोज पालवे/महेंद्र गोडबोले 6-0; खुला गट: सारंग पाबळकर/अमोघ बेहेरे वि.वि.संतोष दळवी/राजेंद्र देशमुख 6-2; 90अधिक गट: योगेश पंतसचिव/सुंदर अय्यर वि.वि.राजू पिंपळे/बापू पायगुडे 6-0; खुला गट: अनुप मिंडा/वरुण मागिकर वि.वि.सुबोध पेठे/महेंद्र गोडबोले 6-0).