मारुती सुझुकी ऑटोप्री(सिजन 1)च्या पुणे फेरीत पिंकेश ठक्कर, अजिंत्य मेहरोत्रा वेगवान रायडर
पुणे: मारुती सुझुकी ऑटोप्री(सिजन 1) रॅलीची पुणे फेरीची आज सांगता झाली असून त्यामध्ये पिंकेश ठक्कर व अचिंत्य मेहरोत्रा यांनी अनुक्रमे हौशी व सर्वसाधारण गटात वेगवान रायडर ‘किताब पटकावून रॅलीवर वर्चस्व गाजवले. स्मिता गोंदकर यांनी महिला गटात वेगवान रायडरचा ‘किताब पटकावला.
या रॅलीची पुणे फेरी अंत्यत उत्साही वातावरणात पार पडली. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे नातेवाईक व पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदयोन्मुख स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी मारुती सुझुकी ऑटोप्रीने जागेवरच नावनोंदणी करण्याची सोपी पद्धत अवलंबली होती आणि स्पर्धकांना त्यांच्या रोजच्या मोटरीत कोणतेही बदल न करता सहभागी होता आले.
प्रत्येक विभागातील विजेता आता 25 फेब्रुवारी रोजी ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. मारुती सुझुकी ऑटोप्री(सिजन 1) च्या राष्ट्रीय विजेत्याला मारुती सुझुकी स्विफ्ट भेट देण्यात येणार आहे. तसेच, विविध शहरांमधील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहे.