पुणे, 18 मे 2022: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए 18वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात मुंबईच्या ओमर सुमर, पुण्याच्या सार्थ बनसोडे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात पाचव्या मानांकित ओमर सुमर याने अव्वल मानांकित अर्जुन अभ्यंकरचा 6-2, 6-0 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. सार्थ बनसोडे याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत चौथ्या मानांकित पार्थ देवरुखकरचा 2-6, 6-3, 6-0 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. क्वालिफायर पुण्याच्या सिद्धार्थ मराठेने आपला शहर सहकारी अभिराम निलाखेला 6-4, 6-2 असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित अनमोल नागपुरे याने सातव्या मानांकित अर्णव कोकणेला 7-5, 6-3 असे पराभूत केले.
मुलींच्या गटात सातव्या मानांकित सेजल भुतडा हिने श्रावणी देशमुखचा 6-2, 6-2 असा सहज पराभव केला. क्वालिफायर प्रिशा शिंदेने कर्नाटकाच्या सोनिका जडिशचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. सिद्धी खोतने श्रुती नानजकरचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात सार्थ बनसोडे व सिद्धार्थ मराठे या जोडीने दिव्यांक कवितके व सर्वेश झवर या चौथ्या मानांकित जोडीचा 6-3, 6-1 असा पराभव केला. स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी: मुले:ओमर सुमर(महा)[5]वि.वि.अर्जुन अभ्यंकर(महा)[1] 6-2, 6-0; सिद्धार्थ मराठे(महा)वि.वि.अभिराम निलाखे(महा) 6-4, 6-2; सार्थ बनसोडे(महा)वि.वि.पार्थ देवरुखकर(महा)[4] 2-6, 6-3, 6-0;अनमोल नागपुरे(महा)[2]वि.वि.अर्णव कोकणे(महा)[7] 7-5, 6-3;
मुली:
सेजल भुतडा(महा)[7]वि.वि.श्रावणी देशमुख(महा) 6-2, 6-2; प्रिशा शिंदे(महा)वि.वि.सोनिका जडिश(कर्नाटक)6-0, 6-0; डेनिका फर्नांडो(महा)[8]वि.वि.वैष्णवी चौहान(महा) 6-0, 6-1; सिद्धी खोत(महा)वि.वि.श्रुती नानजकर(महा) 7-6(5), 7-5;
दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी: मुले:पार्थ देवरुखकर/अर्जुन अभ्यंकर[1] वि.वि.अर्जुन कीर्तने/अभिराम निलाखे 6-2, 6-4;
सार्थ बनसोडे/सिद्धार्थ मराठे वि.वि.दिव्यांक कवितके/सर्वेश झवर[4] 6-3, 6-1;साहिल तांबट/अर्णव कोकणे[3] वि.वि.राधेय शहाणे/ईशान देगमवार 6-1, 6-4;ओमर सुमर/अनमोल नागपुरे[2] वि.वि.स्वराज ढमढेरे/नीव कोठारी 6-2, 6-2.