पुणे,- कोरोनासारख्या जागतिक महामारीने संपुर्ण जग संकटात असताना या संकटाचा सामना करण्यासाठी काही ठराविक क्षेत्रातील कोरोना योध्दे लढत आहेत. त्यांच्यामूळेच आपण सर्वजण निश्चिंत आहोत. मात्र, अशा या कोरोना योध्यांचा गौरव करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. हिच संकल्पना डोक्यात ठेऊन नगरसेवक सुभाष जगताप यांनी कोरोना योध्यांचे वॅाल पेंटिग काढून त्यांचा गौरव केला आहे. निलेश आर्टिस्ट यांनी हे अतिशय सुंदर आणि आकर्षक वॅाल पेंटिग साकारले आहे. शिंदे हायस्कुल, सहकारनगर येथील चौकात कोरोना योध्दा असणारी वॅाल पेंटिग करण्यात आली आहे. या वॅाल पेंटिग मध्ये डॉक्टर्स, पोलिस, जवान,शेतकरी, नर्स, पत्रकार व साफसफाई कामगार यांचा समावेश आहे. तसेच त्या पेटिंग मध्ये ‘मी’ म्हणून व्यक्तीचे ही चित्र काढण्यात आले आहे. इतर कोरोना योद्ध्यांसमवेत स्वतःचा ही कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला आहे. डॉक्टर्स, पोलिस, जवान, शेतकरी, नर्स, पत्रकार व साफसफाई कामगार हे कोरोनाच्या संकटाच्या काळात सुध्दा आपआपल्या ठिकाणी उपस्थित राहून सेवा करित होते. त्यामूळे या सर्व योध्दांचा गौरव या वॅाल पेटिंगच्या माध्यमातून करण्यात आला आहे.याविषयी बोलताना नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले, “जगावर कोरोनाचं संकट असताना ही डॉक्टर्स, पोलिस, जवान, शेतकरी, नर्स, पत्रकार व साफसफाई कामगार हे आपल्यासाठी मुठीत जीव घेऊन काम करित होते. म्हणून त्यांचा गौरव केला पाहिजे या उद्देशाने हे वॅाल पेंटिग साकारण्यात आले आहे. समाजातील प्रत्येकाने कोरोना योध्दांचा गौरव केला पाहिजे. तरच, त्यांना काम करण्याचे समाधान लाभेल आणि प्रेरणा मिळेल. या सर्वांविषयी आपण सहानुभूवती व प्रेमाची भावना जागविली पाहिजे.असे जगताप म्हणाले