पुणे – कोरोना काळात भांबुर्डा वन उद्यान नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आले होते.सदयपरिस्थितीत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा खाली आला असून, महानगरपालिकेची सर्व उद्याने खुली होत आहेत. तरी नागरिकांसाठी भांबुर्डी वन उद्यान
नागरिकांकडून कोणतेही शुल्क न घेता खुले केले जावे अशी विनंती आदित्य माळवे यांनी उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने टप्याटप्प्याने विविध क्षेत्र सुरू करण्याबरोबरच महापालिकेची उदयाने देखील
आबालवृद्धांसाठी खुली करण्यात आली. मात्र, भांबुर्डा वन उद्यान अद्यापही बंद होते. आता पुणे वन विभागाकडून भांबुर्डी वन उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून हे उद्यान सुरू केले जाणार असल्याचे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.